क्रांती रेडकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र…आज बाळासाहेब ठाकरे असते तर…

फोटो - सौजन्य

न्यूज डेस्क – क्रुझ ड्रग्ज प्रकरणात घेरलेल्या एनसीबीचे मुंबई झोन संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून न्याय मागितला आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ते नक्कीच स्वीकारले नसते.

माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे..छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेव ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले.. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे.. लढते
आहे..

सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत.. मी एक कलाकार आहे.. राजनीती मला कळत नाही.. आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही.. आमचा कहिही संबंध नसताना रोज़ सकाळी आमच्या अब्रू ची लख्तरं चार चौघात उधळली जातात.. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे.. विनोद करून ठेवला आहे.. आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं..

एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेलं आहे.. आज ते नाही पण तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो.. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.. तुम्हीं कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याचि मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती.
आपली बहिण,
क्रांति रेडकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here