कोकण विभाग भाजयुमो तर्फे १५ ट्रक रेशनचे पूरग्रस्तांना वाटप…

मुंबई – धीरज घोलप

कोकणात झालेल्या मुसलधार पावसाने रायगड मधील महाड पोलादपूर तसेच चिपळूण मध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाले. महाड मधील बाजारपेठ , घरे , रुग्णालय , शासकीय कार्यालये तर चिपळूण बस स्थानक पूर्णता पाण्यात गेले. पोलादपूर मध्ये ही काही सखल भागात पाणी साचले तर काही गावात दरडी कोसळल्या.

पूरग्रस्तांना राज्यातून विविध ठिकाणाहून मदतीचा हात पुढे केला जात आहे. भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभाग भाजयुमो तर्फे महाड, पोलादपूर आणि चिपळूण मधील पूरग्रस्त भागात १५ ट्रक रेशन सामान आणि रोड स्वच्छतेसाठी २ टँकर पाणी नेण्यात आले.

तसेच युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यानी महाड मधील रुग्णालय व ज्या ज्या भागात पाण्यामुळे चिखल, माती साचले होते ते सर्व परिसर स्वच्छ करण्यात आले आहे. स्वतः प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी स्वच्छता अभियानात भाग घेत कार्यकर्त्यांकडून परिसर स्वच्छ करून घेतले.

भाजयुमो च्या माध्यमातून राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून ही मदत पूरग्रस्तांना पाठवण्यात येत आहे. यावेळी कोकण विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्रातील पदाधिकारी व युवा मोर्चाचे २०० कार्यकर्ते उपस्थित असल्याचे महाराष्ट्र मीडिया प्रभारी विमल जैन कोठारी यांनी माहिती देताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here