डिसेंबर पासून कोल्हापूर तिरुपती विमानसेवा दररोज सुरू…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असणारी इंडिगो एअर लाईन्स कोल्हापूर तिरुपती विमानसेवा संध्या आठवड्यातील चार दिवस सुरू असुन 1 डिसेबर पासुन आठवड्यातील सातही दिवशी ही विमानसेवा नियमीत सुरू राहणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विमानतळ संचालक कमल कुमार काटारिया यांनी दिली.

तिरुपती – कोल्हापुर या मार्गावर महामारी घ्या पुर्वी दररोज विमानसेवा सुरू होती परंतु महामारी मध्ये सर्व मंदिरे बंद असल्यामुळे कोल्हापूर तिरुपती विमानसेवा ही बंद ठेवण्यात आली.सध्या सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार अशी आठवड्यातुन चार दिवस सदर विमानसेवा सुरू आहे परंतु 1 डिसेबर पासुन कोल्हापूर तिरुपती विमानसेवा आठवड्यातुन सातही दिवस सुरू राहणार आहे.

विमानाने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून यापुर्वी काही दुधु संस्था सहकारी संस्था मार्केटिंग कंपन्या यांनीही आपल्या सभासदांसाठी या विमान सेवेचा लाभ करून दिल्यामुळे कष्टकऱ्यांचे ही प्रवासाची स्वप्न. साकार झाले.माफक दरामध्ये अनेकांनी या सेवेचा लाभ घेतला होता.

सुरवातीच्या काळात ही सेवा हैदराबाद मार्गे सुरू होती परंतु मिळणारा प्रतिसाद पाहून ती कोल्हापूर ते थेट तिरुपती वरूण दुपारी 12 वाजुन 5 मिनिटांनी विमान कोल्हापूरसाठी प्रस्थान करेल तर 1 वाजुन 50 मिनिटांनी कोल्हापूर मध्ये आगमन होईल.त्यानंतर कोल्हापूर तिरुपती साठी 2 वाजुन 20 मिनिटांनी विमान टेक ऑफ करेल ते ठिक 4 वाजता तिरुपती मध्ये लॅडिग करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here