कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सिमेवर आंदोलन…

आरटीपीसीआर व्यतिरिक्त चंदगड,आजरा,गडहिंग्लज येथील प्रवाशांना सोडण्याची मागणी…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

महाराष्ट्र राज्यात कोरोणा डेल्टाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कर्नाटक सरकारने पुणे बंगळूर महामार्ग कोगनोळी ता.निपाणी येथे कोरोणा सिमा तपासणी नाका उभारला आहे..याआधी आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट किंवा कोरोणा प्रतिबंधित लस घेतलेले प्रमाणपत्र असल्यास कर्नाटकात प्रवेश दिला जात होता.

पण दि.31 जुलै पासून फक्त आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असला तरच प्रवेश दिला जात आहे…त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा,गडहिंग्लज,चंदगड तालुक्यात व कागल तालुक्यातील काही गावांना जाण्यासाठी यामार्गावरुनच जावे लागते…पण या महाराष्ट्रातील शहरे व गावांना जातेवेळी आरटीपीसीआरची मागणी होत होती.

म्हणून या महाराष्ट्राच्या तालुक्यातील प्रवाशांना आरटीपीसीआर व्यतिरिक्त सोडावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुणे बंगळूर महामार्ग कोगनोळी सिमातपासणी नाक्यालगत आंदोलन केले.यावेळी शिवसेना पदाधिकारी व चिक्कोडी डिवायएसपी मनोजकुमार नायक, निपाणी सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्यासोबत चर्चा करताना महाराष्ट्रातील प्रवाशांना सोडण्याबाबत मागणी करत होते . वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेऊ असे डीवायएसपी नायक यांनी सांगितले.

त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या कर्नाटक पासिंगच्या गाड्या आडवल्याने पुणे बंगळूर महामार्गावर वाहतूकिची कोंडी पहायला मिळाली.यावेळी कानडी सरकारचा धिक्कार असो.. आशा घोषणा दिल्या जात होत्या..महामार्गावर वाहतूकीची कोंडी होत असल्याने कागल पोलिसांनी शिवसेनेचे विजय देवणे,संपत पवार यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.

याप्रसंगी निपाणी ग्रामीण उपनिरीक्षक अनिल कुंभार,एस ए टोलगी,एएसआय कंभार,शेखर असोदे ,अमर चंदनशिव यांच्या सह कर्नाटकातील अनेक पोलिस हजर होते…तर महाराष्ट्रातील करवीर डिवायएसपी आर आर पाटील,कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे,एपीआय दिपक वाकचौरे,एसआय प्रितम पुजारी यांच्यासह महाराष्ट्रातील देखील अनेक पोलीस हजर होते..त्याचबरोबर दोन्ही राज्यातील मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here