कोगनोळी ग्रामपंचायत कडून आंबेडकर नगर येथील स्वच्छता सुरू…

राहुल मेस्त्री

दोन दिवसापूर्वी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये एका सहा वर्षाच्या मुलीला सापाने दंश केल्याची घटन घडली होती.यामुळे कोगनोळी तालुका निपाणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर यांच्यामार्फत सदर परिसरातील स्वच्छता करून व याठिकाणी तन नाशक मारून येथील दोन्ही बाजूच्या गटारी साफ करण्याचे निवेदन कोगनोळी ग्रामपंचायत सादर केले होते.

याची दखल घेत ग्रामपंचायत पी डी ओ कांबळे यांच्या अनुउपस्थितीत येथील अकाउंटंट पी डी चावर यांनी दिलेल्या अश्वासनाची कार्यवाही प्रमाणे येथील परिसरात स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायतीचे दोन कर्मचारी कामाला लावले आहेत.

त्यामुळे येथील नागरिकाकडून कोगनोळी ग्रामपंचायतीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे ..तर या कामाची ग्रामपंचायत अकाउंटंट पी डि चावर ,क्लार्क शिवलिंग दिवटे, रामचंद्र जाधव यांनी पाहणी केली.याप्रसंगी नारायण कोळेकर, विठ्ठल मु.कोळेकर, अनिल नव्हाळे, साताप्पा ढोबळे, सुधाकर ढोबळे, आरुण दाभाडे आदी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here