कोगनोळी दूधगंगा नदीकाठच्या विद्युत मोटारी गायब…बळीराजाचे मोठे नुकसान; पोलिसाकडून चोरट्यांचा शोध सुरू…

राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार कर्नाटक व महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवर असणाऱ्या दूधगंगा नदी वरील चार विद्युत मोटर चोरी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 12 रोजी मध्यरात्री घडली.यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

यापूर्वी देखील अशाप्रकारे तीन ते चारवेळा घटना घडल्यामुळे बिचारा बळीराजा या चोरांच्या उपद्रवामुळे हतबल झाला आहे . त्यामुळे या चोरट्यांचा शोध पोलीस घेणार का? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील दूधगंगा नदीवर पाणी पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांनी विद्युत मोटर बसवले आहे. शुक्रवारी मध्यरात्री बारा ते दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जुन्या पुलानजीक असणाऱ्या दुधगंगा नदीच्या काठच्या चार विद्युत मोटरी चोरून नेल्या तर एक विद्युत मोटर खोलून रस्त्यालगत आणून टाकली होती.

यामध्ये अंकुश दाभाडे यांची 5 एच पी, विठ्ठल कोळेकर यांची 5 एच पी, रामगोंडा चौगुले यांची 5 एचपी, महावीर चौगुले यांची 5 एचपी विद्युत पंप चोरून चोरट्यांनी डल्ला मारला . तर सचिन चौगुले यांची 5 एचपी विद्युत मोटार खोलून सोडून पळ काढलेला दिसून येतो.

या ठिकाणी असणाऱ्या दूध गंगा नदीवरील विद्युत मोटर चोरून नेण्याची ही घटना तिसऱ्यांदा घडली असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे. वारंवार होणाऱ्या या चोरीमुळे शेतकरीवर्ग धास्तावला असून पोलीस व प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. सदर चोरीच्या घटनेची माहिती कोगनोळी पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here