Saturday, September 23, 2023
HomeIPL 2023KKR vs RCB | कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ८१ धावांनी...

KKR vs RCB | कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ८१ धावांनी पराभूत केले…

IPL 2023 : च्या नवव्या सामन्यात KKR vs RCB कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 81 धावांनी पराभव केला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 204 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ १२३ धावांवर गारद झाला आणि सामना गमावला.

कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 81 धावांनी पराभव केला. यासह कोलकाता संघाने स्पर्धेतील पहिला विजय संपादन केला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने शार्दुल ठाकूरच्या 68, रहमानउल्लाह गुरबाजच्या 57 आणि रिंकू सिंगच्या 46 धावांच्या जोरावर सात गडी गमावून 204 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ 17.4 षटकांत 123 धावांवर गारद झाला. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक २३ धावा केल्या.

कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने चार, सुयश शर्माने तीन आणि सुनील नरेनने दोन गडी बाद केले. शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली. तर बेंगळुरूकडून डेव्हिड विली आणि कर्ण शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद सिराज, मायकेल ब्रेसवेल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: