शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ माकप आणि किसान सभेचा महामार्गावर ठिय्या…

मनोर – केंद्र सरकारमार्फत लादण्यात आलेल्या शेतकरी विरोधी कृषी कयद्यांविरोधात दिल्ली हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (ता.03) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने मुंबई अहमदाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाटा उड्डाणपुलाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून दडपशाही करणाऱ्या जुलमी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.दिल्ली शहराच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त करीत कार्पोरेट धार्जिणे शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी,

आंदोलकांकडून करण्यात आली.यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव सुदाम धिंडा,किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन बुधर, तालुका सचिव सुनील सुर्वे, जनवादी महिला सभेच्या हिना वनगा,शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here