किरण सरनाईकांनी घेतली पहिल्या पसंतीत आघाडी…पण विजयासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांवर तिघांची भिस्त…

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषदेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणीच्या पहिल्या पसंतीच्या दुसऱ्या व अंतिम फेरीत अमरावती विभागीय शिक्षक संघाचे उमेदवार किरण सरनाईक यांनी ९६६ मतांची निर्णायक आघाडी घेतली असून विजयासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांवर तिघांचीही दारोमदार असेल.

अत्यंत चुरशीच्या ठरत असलेल्या या लढतीत आमरावती विभागीय शिक्षक संघाचे किरण सरनाईक यांनी आपल्या संपर्काच्या बळावर सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीच्या दुसऱ्या व अंतीम फेरीत किरण सरनाईक ६०८८ मतांसह आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे श्रीकांद देशपांडे ५१२२ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत, शेखर भोयर ४८८९ मतांसह तिसऱ्या, संगिता शिंदे (२८५७)

चौथ्या, विज्युक्टाचे डॉ.प्रा.अविनाश बोर्डे (२७४७) पाचव्या, तर भाजपचे प्रा.डॉ.धांडे (२१२७) सहाव्या क्रमांकावर आहेत. विजयासाठी आवश्यक असणारा १४५५१ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आता दुसऱ्या पसंतीच्या मतांवर सर्वांची दारोमदार असून सरनाईक, देशपांडे, भोयर यांच्यापैकी कोण बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणी पूर्ण होण्यास उद्याची दुपार होण्याची शक्यता त्यामुळे वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here