Home Breaking News in Marathi

अमरावती | दुसऱ्या राउंड नंतर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक ९६६ मतांनी आघाडीवर…निकालाची भिस्त आता दुसऱ्या पसंतीवर…

अमरावती, दि. ३ : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या पहिल्या फेरीचा निकाल आला तेव्हा लोकांना अपेक्षित नसलेले अपक्ष उमेदवार किरण सरनाईक ३१३१ मत घेवून आघाडीवर होते, आता दुसऱ्या फेरीतही निकालात सरनाईक सरस ठरले. निकालाची भिस्त आता दुसऱ्या पसंतीवर असल्याने लोकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना २३०० मते घेवून दुसर्या क्रमांकावर होत. पहिल्या पसंतीच्या मतगणनेच्या दुसऱ्या फेरीमध्ये १६ हजार ९१९ मतांपैकी ६०१ मते अवैध व १६ हजार ३१८ मते वैध ठरली.

30918 हजार मतांची मोजणी पूर्ण…

किरण सरनाईक,अपक्ष 3131+2957= 6088

श्रीकांत देशपांडे(महा विकास आघाडी)
2300+2822 = 5122

शेखर भोयर,अपक्ष
2078 +2811= 4889

संगीता शिंदे अपक्ष उमेदवार
1304+1553=2857

दोन्ही फेऱ्या मिळून ३० हजार ९१८ मतांपैकी २९ हजार ८२९ मते वैध व १ हजार ८९ मते अवैध ठरली.

त्यानुसार २९ हजार ८२९ या वैध मतांना भागीले दोन अधिक एक असे सूत्र वापरून कोटा निश्चित करण्यात आला आहे.

विलासनगर येथील शासकीय गोदाम येथे असलेल्या मजमोजणी स्थळी आज सकाळी सहा वाजता सर्व अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सर्वांना पुन्हा त्यांची जबाबदारी समजावून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा कक्षाचे सील तोडून मतपेट्या मतमोजणी कक्षात हलविण्यात आल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!