किरण गोसावीच्या सेल्फीमुळे संपूर्ण आर्यन प्रकरणाची डिल कॅन्सल झाली…विजय पगारे यांचा खळबळजनक दावा…

फोटो- सौजन्य Twitter

न्यूज डेस्क – आर्यन खान ड्रग्स प्रकरणात रोज नवीन आणि खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या विजय पगारे यांनी टीव्ही 9 मराठी दिलेल्या मुलाखतीत मोठे गौप्यस्फोट केले आहेत. आर्यन खान प्रकरणात मोठं रॅकेट काम करत होतं. आर्यनवरील कारवाई ठरवून केली गेलीय. या प्रकरणात पूजा ददलानी, सॅम डिसोझा, मनिष भानुशाली आणि मास्टर माईंड सुनील पाटील यांच्यात 100 टक्के डील झाली होती, असा दावा पगारे यांनी केलाय.

विजय पगारे यांनी मराठी वृत्तवाहिनी टी व्हि 9 ला दिलेल्या मुलाखतीत मोठे खुलासे आहेत, पगारे यांना आर्यन खान प्रकरणात झालेल्या डीलमध्ये समीर वानखेडे यांचा संबंध आहे का? असा प्रश्न विचारल्यावर त्याबाबत मी खात्रीशिरपणे काही सांगू शकत नाही. पण भानुशालीने बोलता बोलता एकदोन वेळा समीर वानखेडेंचं नाव घेतलं होतं. वानखेडे साब से बात हुथी क्या, वानखेडे साहबसे बात हुई थी क्या असं तो बोलत होता, असं विजय पगारे यांनी सांगितलं.

‘गोसावीच्या सेल्फीमुळे डील रद्द झाली’
सुनील पाटीलने 5 तारखेला मला तो विषय सांगितला. ते केपी गोसावीबरोबर बोलत होते. केपी पैसे परत कर म्हणून सांगत होते. केपी म्हणाले. माझ्याकडून काही पैसे खर्च झाले. 38 लाख पाठवून दिले. चार पाच लाखाची व्यवस्था करतोय, ते पाठवून देतो असं केपी गोसावी म्हणाले. सुनील संतापून बोलत होते. तुझ्या सेल्फीमुळे आणि तुझ्या चरबीमुळे संपूर्ण डील फेल झाली. तुला सेल्फीची चरबी चढली होती. तुझ्या सेल्फीमुळे आपले 18 कोटी गेले. माझे काय हाल झालेत, मी काय भिकारी झालो. माझ्या समोर देणेकरी बसलेत. मला पैसे द्यायचे आहेत. तुझ्यामुळे सेल्फीमुळे संपूर्ण डिल कॅन्सल झाली, असं सुनील पाटील हे केपी गोसावी बोलत असल्याचे विजय पगारे यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.

निवेदनात विजय पगारे यांनी दावा केला आहे की, 2 ऑक्टोबर रोजी क्रूझ जहाजावरील छापा पूर्वनियोजित होता आणि बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला काही लोकांनी पैसे कमावण्यासाठी तयार केले होते. समीर वानखेडेने आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण केल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता.

साक्षीदार विजय पगारे यांनी TV 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना हा छापा पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला. याआधी, या खटल्यातील आणखी एक स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईलने आरोप केला होता की, एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी आर्यनला सोडण्याच्या बदल्यात पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. एनसीबी आधीच या आरोपांची चौकशी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here