नागपूर – शरद नागदेवे
सुपारी किलर मनीष श्रीवास हत्याकांडचा प्रमुख सुत्रधार रंजीत सफेलकर याला अटक करण्यात पोलीसांना मोठे यश मीळाले.सफेलकरला बुधवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी च्या समक्ष पेश करण्यात आले.सफेलकरला ७ दिवस पोलीस रिमांड वर पाठविण्यात आले.
मनीष श्रीवास हत्याकांड मध्ये नाव आल्याने त्याचा सोबतींना अटक केल्यानंतर रणजित सफेलकर फरार झाला होता.काही दिवसा आधी रणजित सफेलकर डंपर मध्ये लपून पळतांनी पोलीसांनी त्याचा पाठलाग केला असता तो पोलीसांना चकमा देउन भंडाऱ्यावरून पळाला. परंतु सफेलकरची बॅंग डंपर मध्यें राहली.त्यामध्ये पोलीसांना त्याचा पासपोर्ट,पॅनकार्ड, आधार कार्ड,दोन एटीएम कार्ड पोलीसांना मीळाले.पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत होती.
शेवटी मंगळवारी रात्री सफेलकरला नागपूर मधूनच अपराध शाखेचा पोलीसांनी अटक केली.सुत्रानुसार ४ मार्च २०१२ आरोपी रणजित सफेलकर, शरद उर्फ कालू हाटे भरत हाटे,छोटू बागडे,हेमंत गोरखा व अन्य सोबतींने मनिषला महिलेचे आमिष दाखवून त्याचे अपहरण करून नंतर पवनगाव (चारगांव) च्या एका घरामध्ये हत्या करून त्याचे शव कामठी मध्ये आणले व त्याचे तुकडे, तुकडे करुन कार मध्ये टाकून कुरई घाटात जाऊन फेकण्यात आले.