खुमारी शाळेचा अनिरूद्ध आकाशवाणीवर, १० फेब्रुवारीला होणार प्रसारण, शाळाबाहेरची शाळा उपक्रमात सहभाग…

रामटेक – राजू कापसे

रामटेक पंचायत समिती केंद्र मनसर अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळा खुमारी येथील अनिरूद्ध धनराज नारनवरे हा इयत्ता दुसरीचा विद्यार्थ्याची मुलाखत एपिसोड क्रमांक २५९ करिता ध्वनीमुद्रीत करण्यांत आली असून १० फेब्रुवारी २२ ला आकाशवाणी नागपुरच्या अ (५१२.८) केंद्रावरून सकाळी १०-३० वाजता प्रसारण होईल. अध्ययन स्तर निश्चिती तसेच गुणवत्ता विकास अंतर्गत कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी सदर अनिरूद्धची मुलाखत घेण्यांत आली.

प्रथम संस्थेच्या माध्यमातून शाळाबाहेरची शाळा कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्याशी संवाद साधण्यात आलेला आहे.अनिरूद्धची निवड होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने,प्रथम संस्थेचे संदीप गजभिये,सचिन नासरे केंद्रप्रमुख राजकुमार पचारे यांचे मार्गदर्शन यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद डुमरे सरपंच संगीता पाटील,

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर नागपुरे वर्गशिक्षिका प्रतिभा येलपुरे शिक्षक जगदिश इनवाते,प्रीती ढवळे प्रशांत जांभुळकर सह मनसर केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकांचे सहकार्य लाभले.सदर मुलाखतीत अनिरूद्धला विचारलेल्या प्रश्नांची त्याने सहजतेने व आत्मविश्वासाने उत्तरे दिलीत.अनिरूद्ध नारनवरे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here