विजबिलांच्या तक्रारींची दखल न घेतल्याने खेड तालुका मनसेचे खळखट्याक…

राजगुरूनगर ( पुणे ) : लॉकडाऊनच्या काळातील ग्राहकांना वाढीव विजबिले कमी करावीत,विजबिले दुरुस्ती करून मिळावीत,रीडिंग प्रमाणे महिन्यानुसार बिले मिळावीत यासाठी मनसेच्या वतीने वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना मागील काही दिवसांपूर्वी सविस्तर निवेदन देण्यात आले होते.

मात्र वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत वीज पुरवठा मंडळच्या कार्यालयात तोडफोड करून वीज मंडळच्या गलथान कारभाराचा निषेध केला.राजगुरूनगर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here