आलेगांव परिसरातील ७० टक्के शेतकऱ्यांची खरीप पेरणी उलटली !…

बोगस बीजवाही व आदळणी पावसाने झाले नुकसान !

पातूर : २३ पातूर तालुक्यातील आलेगांव परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांची दि १७ जून पर्यंत खरीप पेरणी आटोपली परंतु उगवनशक्ती कमी असलेले सोयाबीन बीज व आदळणीच्या पावसाने जवळपास ७०% शेतकऱ्यांची खरीप पेरणी उलटल्याने सदर परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामध्ये वरून राजाने आलेगावासह परिसरामध्ये दि १ ते ३ जून पर्यंत वरून राजाने दमदार हजेरी लावली त्यामुळे साहजिकच आलेगांव परिसरातील शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन ७ तारखे पासून लागलेल्या मृग नक्षत्रामध्ये खरीप पेरणी आटोपती घ्यावी या अनुषंगाने सुरुवात करून १७ तारखे पर्यंत सदर परिसरातील ९०टक्के शेतकऱ्यांनी खरीप पेरणी आटोपती घेतली.

गत वर्षीपेक्षा यावर्षी खरीप पेरणी मृग नक्षत्रामध्येच पेरणी झाल्याने शेतकऱ्यांनी चिंतेत असणारा श्वास सोडला.पेरणी नंतर झालेला आदळणीचा पाऊस व उगवनशक्ती कमी असलेले सोयाबीन बीजवाही आदी मुळे आलेगांव परिसरातील ७०% शेतकऱ्यांची खरीप पेरणी उलटल्याने सदर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.


बीजवाहीच्या वाढलेल्या दराने केले शेतकऱ्यांचे नुकसान!


आधीच आर्थिक संकटाने कमजोर झालेल्या शेतकऱ्यांना कृषिसेवा केंद्रामध्ये असलेले महागडे बियाणे परवडेनासे वाटल्याने जवळपास ७०% शेतकऱ्यांनी घरघुती सोयाबीन बीजवाही वापरून तर काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यां कडूनच सोयाबीन बीज खरेदी करून खरीप पेरणी केली.

वास्तविक गत वर्षी सततच्या पावसाने मार खाल्लेल्या सोयाबीनच्या बीजवाहीवर चांगलाच परिणाम झाल्याने सदर बीजवाहीची उगवनशक्ती कमी मुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसला असे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.

काही शेतकऱ्यांनी विविध कंपण्यांचे महागडे बीजवाही खरेदी करून पेरणी केली. परंतु बियाणे उगवलेच नसल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.ह्यामध्ये आदळणीच्या पावसाचा सुद्धा परिणाम असू शकतो.


दुबार खरीप पेरणी करिता पैसाच नाही.


शासना कडून शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली असली तरी कर्जमाफ़ झालेल्या शेतकऱ्यांना विविध बँके कडून पिककर्जाचे वाटप झाले नसल्याने शेतकऱ्यांनी उधार उसनवारी करून खरीप पेरणी केली असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.

मिळाल्या नंतर उधारी चुकवू परंतु उधार उसनवारी फेडणे व्हायच्या आधी सदर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले.आता तरी विविध बँकांनी शेतकऱ्यांची दखल घेऊन पीककर्ज वाटप तात्काळ करावा जेणे करून शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्यास विलंब होणार नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here