चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा गावात वाघाने घेतला एकाचा बळी…वाघाला ठार मारण्याची गावकऱ्यांची मागणी…

चंद्रपुर – राकेश दुर्गे

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात खांबाडा इथं आज वाघाने एका व्यक्तीचा बळी घेतल्यानंतर या वाघाला ठार मारण्याची मागणी जोर धरू लागली असून लोकांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. या परिसरामध्ये आतापर्यंत नऊ जणांना वाघाने ठार केले आहे. या वाघाची दहशत लक्षात घेता त्याला पकडण्याचे आणि प्रसंगी मारण्याचे आदेश ऑगस्टमध्येच देण्यात आले आहेत.

तेव्हापासून वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. शंभरावर कॅमेरे, 30 मचाण, चार शूटर्स, शंभरावर वन कर्मचारी इथे तैनात आहेत. मात्र या सर्व यंत्रणेला हा वाघ हुलकावणी देत आहे. जंगलात किंवा जंगलशेजारी कामासाठी गेलेल्या लोकांवर या वाघाने आजपर्यंत हल्ले केले आहेत. या भागातील अनेक गावातील शेती जंगलालगत आहे.

आता पीक काढणीचे दिवस असल्याने शेतकरी-शेतमजूर कामावर जाऊ लागले. अशात या वाघाची भीती निर्माण झाल्याने शेतीची कामेही प्रभावित झाली आहेत. त्यामुळे या वाघाला तातडीनं पकडा किंवा मारा, अशी संतप्त मागणी समोर येत आहे. मात्र, हा वाघ नरभक्षक नसून नरघातक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्याला पकडण्याची मोहीम आणखी गतिमान करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here