खादी हे वस्त्र नसून एक विचार आहे – महात्मा गांधी…

डेस्क न्युज – २ ऑक्टोबर २०२० राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीच्या निमित्याने महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळ जिल्हा कार्यालय अकोला येथे पार पडलेल्या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहत खऱ्या अर्थाने अध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेऊन २ वर्षे पूर्ण झाली.

यावेळी कार्यालयाची पाहणी केली.महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या कार्याची माहिती सर्व सामान्य तरुणांना व्हावी.व त्या मधून लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या साठी यापुढे काम करतांना सर्व अधिकारी व कर्मचारी वृंदाच्या सहकार्याने प्रयत्न करत राहील अशे प्रतिपादन केले.महाराष्ट्रातील खादी व ग्रामद्योगाच्या विकासकार्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची सन १९६२ मध्ये स्थापना केली आहे.

ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार, खेड्यापाड्यांतील कारागीर व बलुतेदार यांच्या उद्योगाचे स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृद्धी,खादी व ग्रामोद्योगासाठी पतपुरवठा, कच्च्या माल पुरवठ्याची शिफारस,कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन, तयार मालाच्या विक्रीस मदत, निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण,

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगाच्या विकासास पोषक असे धोरण ठरविण्याबाबत शासनाशी प्रभावी संपर्क,स्थानिक साधनसंपत्तीचा वापर करून ग्रामीण भागातील कारागिरांना रोजगार मिळवून देणे या प्रकल्पांना गरजूंपर्यंत पोहचविण्याचे काम करण्याचा निश्चय यावेळी केला.यापुढे काम करतांना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती प्रत्येक गरजवंताला मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करू.

त्यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम तसेच सूक्ष्म उद्योग उभारण्यासाठी पहिल्या पिढीच्या उद्योजकांना उद्योगी बनवणारी ही योजना आहे.तरी आपण सर्व मिळून हे कार्य पुढे नेवू.असे प्रतिपादन यावेळी केले.या वेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सौ.एन.टी.लव्हाळे,सौ.पि.आर.खोटरे,जेष्ठ सहाय्यक,

श्री.के.जे.दागडा,कनिष्ठ सहाय्यक, श्री.आर.एम.बिलबिले, मधूक्षेत्रीक श्री .वि.वि.गाडगीळ,सचिव,श्री.डी.के.लोखंडे, सचिव, श्री.एस.टी.वानखडे, सचिव सौ.एन.आर.तायडे, सचिव, श्रीमती.एम.एम. रेलकर शिपाई, श्री.आर.जे.धुमाळे, अध्यक्ष,ग्रामोद्योग सहकारी संस्था, अकोट,कर्मचारी उपस्थित होते.

महात्मा गांधी ही पाच अक्षरे उच्चारताच आपल्यासमोर सत्य, अहिंसा, स्वावलंबन ही मूल्य उभी राहतात. या मूल्यांच्या, विचारांच्या रूपाने ते कायम आपल्यात आहेत. गरज आहे ती, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून जाण्याची. तसा संकल्प करू. जयंतीदिनी बापूजींना विनम्र अभिवादन….!
Vitthal Sarap Patil – विठ्ठल सरप पाटील अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळ जिल्हा समिति, अकोला.
ShivSena YuvaSena – युवासेना CMOMaharashtra Aaditya Thackeray, Subhash Desai, Vishal Chordia, Bipin Jagtap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here