आर.आर.पाटील फाऊंडेशन आयोजक केतन भोज यांच्यावतीने ज्ञानाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वत्कृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न…

मुंबई – धीरज घोलप

सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवून समाजाच्या आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिक विकासाची गुरुकिल्लीच आपल्याला दिली आहे आणि त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे.

हा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आर.आर.पाटील फाऊंडेशन संलग्न पँथर राजाभाऊ गांधळे सामाजिक संस्था,मायक्रोलिंक फाऊंडेशन या तिन्ही संस्थांनी ज्ञानाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन वत्कृत्व स्पर्धेसाठी आवाहन केलेल्या नंतर तसेच ही स्पर्धा सर्वच वयोगटासाठी खुली असल्यामुळे या स्पर्धेसाठी प्रचंड प्रमाणात विविध स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

या स्पर्धेत पहिले उत्कृष्ट तीन स्पर्धक तसेच दहा उत्तेजनार्थ वक्तृत्व करणारे स्पर्धक निवडण्यात आले.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा थाटामाटात पार पडला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी वरिष्ठ शिक्षका जयश्री काशिद,समाजसेवक निलेश फलके,पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक हनुमंत सा.टाव्हरे,योगेश  कॉमर्स अकॅडमीचे संचालक योगेश बुध्दगे  यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला

तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार ननावरे यांनी केले.हा  कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आर.आर.पाटील फाऊंडेशनचे केतन भोज,पँथर राजाभाऊ गांधळे सामजिक संस्थेचे शरद गांधळे, मायक्रोलिंक फाऊंडेशनचे सचिन मनवळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here