मुख्यमंत्री, प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील यांना नोटीस जारी…
मुर्तीजापूर – महाराष्ट्रात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसरकारने कोणत्याही राजकीय नेत्यांच्या दबावाखाली धार्मिक स्थळे उघडण्यास घाई करू नये. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदी अंतर्गत जोपर्यंत आपत्ती कमी होत नाही तोपर्यंत लोकांच्या जिवितांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात यावी.
अशी मागणी करणारी जनहीत याचिका क्र.9327/2020 मुंबई हायकोर्ट नागपुर खंडपिठात समाज क्रांती आघाडीच्या वतीने आघाडीचे अध्यक्ष प्रा.मुकुंद खैरे यांनी दाखल केली असता हायकोर्टाचे न्यायमुर्ती आर.के.देशपांडे आणि श्रीमती पुष्पा गाणीदीवाला यांनी याचिका स्विकारुन व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कमेटीचे चेअरमन राज्याचे मुख्यमंत्री,
सचिव किशोर निंबाळकर, वंचीत आघाडीचे अॅड.प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे चंद्रकांत पाटिल यांना नोटीस बजावली आहे. अशी माहीती प्रा.मुकुंद खैरे यांनी आघाडीच्या मुख्यालयी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
प्रा.खैरे यांनी पुढे सांगितले की, भारतात सर्वात जास्त कोरोना चा प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयावर राजकीय पुढारी आणि सरकारचे लक्ष नाही. मात्र राजकीय पुढारी मंदिरासाठी आदोलन करीत आहेत आणि सरकार त्यांच्या आंदोलनाला भिक घालत आहे.
मागे प्रकाश आंबेडकरांनी पंढरपुरचे श्री विठ्ठलाचे मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन केले होते तर भाजपाचे चंद्रकांत पाटिल यांच्या नेतृत्वात मंदिरासाठी घटानंद आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर समाज क्रांती आघाडीने उपरोक्त याचिका दाखल केली असुन याचिकेमध्ये सरकारने जनतेच्या जिवीताची सुरक्षा करणे महत्वाचे आहे.
काही लोकांच्या उपजिवीकेसाठी धार्मिक स्थळे आपत्ती व्यवस्थापनाच्या तरतुदीला बाजुला ठेऊन खुले करता येत नाही. मंदिरे उघडण्याचे आंदोलन राजकीय फायद्यासाठी होत असल्याचा आरोप सुद्धा याचिकेत करण्यात आला असुन सरकारने कोणत्याही परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीचा भंग करु नये असे निर्देश कोर्टाने सरकारला द्यावे.
तसेच प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटिल यांना राजकीय फायद्यासाठी मंदिराचे आंदोलन करण्यास मज्जाव करावा अशी प्रार्थना करण्यात आली आहे.समाज क्रांती आघाडीच्या वतीने अॅड.शताब्दी खैरे यांनी कोर्टात बाजु मांडली तर सरकारच्या वतीने अॅड.एन.जी.मेहता यांनी कामकाज सांभाळले. पत्रकार परिषदेत समाज क्रांती आघाडीच्या महीला संघटीका छायाताई खैरे, विमलताई मोटघरे, रजनीताई गवई, नागसेन गवई इत्यादिंची उपस्थिती होती.