कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राला लागले समस्यांचे ग्रहण…

वैधकीय अधिकारी याचां चार्ज नेमका आहे कुनाकडे काही समजे ना… तालुका आरोग्य अधिकारी राहतात नाँट रीचेबल… कावसा आरोग्य केंद्रांची रुग्ण वाहीका गेली कुठे…येथील नागरीकांचा सभ्रम

अकोट कोट्यावधी रुपये खर्च करून बाधंलेल्या अकोट तालुक्यातील ग्राम कावसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक समस्याचे जनु ग्रहनच लागले आहे कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राला बांधुन जवळ जवळ दोन वर्षे पूर्ण झाली आहे मोठ्या थाटा माटात जिल्हा परिषद अध्यक्ष याच्या अस्ते उदघाटन करण्यात आले होते कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राला ऐकुन ४४ गावे ६ उपकेंद्र आहेत तरी सुद्धा सुविधांचा अभाव दिसून येत आहे या आरोग्य केंद्रात एक रूग्ण वाहिका आहे.

गेल्या विस ते पंचवीस दिवसापासून ती रुग्ण वाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसत नाही त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनाने रूग्णालयात दाखल करावे लागत आहे गेल्या दोन दिवसा आदी तरोडा येथील एक गरोदर महिलेला आरोग्य केंद्रात आणले महिलेला खुप त्रास होत होता घरच्या मंडळींनी रूग्णवाहीके बद्दल विचारले असता तर ती रुग्णवाहीका अकोला येथे आहे.

नंतर १०८ रुग्णवाहीकेला फोन केला असता ती पण चार तास आलीच नाही शेवटी त्या गरोदर महिलेला एका खाजगी वाहनाने अकोला येथे जिल्हा स्री रुग्णालय येथे नेण्यात आले कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णवाहिका असती तर नागरीकांची गैरसोय झाली नसती मोल मजुरी करनांऱ्या नागरिकांना विकतची आरोग्य सेवा घेने कठीन आहे.

म्हणुन जिल्हा परिषद तर्फे या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली परंतू या ठिकाणी ४४ गावांचा कारभार असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका नसल्याने नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे,

तत्कालीन जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी घाई करून फक्त ईमारती चे उदघाटन केले पंरतु आज पर्यंत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत नसल्याने खंत व्यक्त केली जात आहे लवकरात लवकर या आरोग्य केंद्राला सुविधा देण्यात यावी व जे बंद पडलेली रुग्णवाहिका ते लवकर चालू करुन नागरीकांच्या सेवेत रुजु करावी असे येथील नागरीकांना मधे बोलले जाता आहे.

कावसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाची फार गैर सोय होत आहे रात्री बे रात्री रूग्ण गेला की डाँक्टर अकोला येथे पाठवतात व त्यातच रूग्ण वाहीका नसल्याने रूग्णालयात तास तास खासगी वाहनाची वाट पहावी लागत आहे एखाद्या रुग्णाला काही झाले तर याला जबाबदार कोन

विलास साबळे सरपंच तरोडा गेल्या कित्येक दिवसांपासून आरोग्य केंद्रात रुग्णवाहीका नाही या बद्दल मि स्वःता तालुका आरोग्य अधिकारी याना विचारले असता त्यांनी मला सांगीतले की जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या आदेशानुसार रुग्णवाहिका अकोला येथे उभी आहे असे सांगितले आहे
सौ. कोमल गोपाल पेठे
जिल्हा परिषद सदस्य
कुटासा सर्कल

मि माझ्या बहिणीला ६/९/२०२० ला सकाळी ११/३० ला प्राथमीक आरोग्य केंद्रात घेऊन गेलो होतो ती गरोदर होती कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेलो असता प्राथमिक आरोग्य केंद्रांत फक्त एक नर्स हजर होती.

रुग्णवाहिका पन नव्हती १०८ ला फोन केला असता कोणतीच रुग्ण वाहीका आली नाही शेवटी मला माझ्या बहीनीला एका खासगी वाहनाने अकोला येथील रुग्णालयात न्यावे लागले मग कावसा प्राथमीक आरोग्य केंद्रांची रुग्ण वाहीका गेली कुठे धिरज भटकर नागरीक तरोडा. कावसा प्राथमीक आरोग्य केंद्रांत रुग्नाची गैरसोय होत आहे.कधी डाॅक्टर उपलब्ध नसतात तर कधी मेडीसीन उपलब्ध नसते या आरोग्य केंद्रात सर्व भोगंळ कारोबार सुरु आहे.असे येथील नागरीक बोलत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here