कर्नाटकातील दहावीच्या परिक्षेला आज पासून सुरवात…

राहुल मेस्त्री

कोरोणा व्हायरस या जागतिक महामारीने संपूर्ण जगाला त्रस्त केले आहे.याचा परिणाम जवळपास सर्वच क्षेत्रावर पहायला मिळत आहे.शैक्षणिक क्षेत्रातही असेच पहायला मिळाल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विद्यार्थ्यांना शाळेत नाहीतर घरात बसुनच अभ्यास करावा लागत होता.

अखेर शाळेत जाऊन परिक्षा देण्याची वेळ आली असुन दि.19रोजी कर्नाटकातील एस एस एल सी दहावीच्या परिक्षेला प्रारंभ झाला आहे.शेजारच्या महाराष्ट्र राज्यात परिक्षा न घेता दहावीचा निकाल जाहीर केला असला तरी कर्नाटक सरकारने आपल्या राज्यात दहावीची परिक्षा गत वर्षीही घेतली होती.आणि यंदाही घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोगनोळी ता.निपाणी येथील विरकुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ कोगनोळी हायस्कूल कोगनोळी येथे दहावीच्या परिक्षेसाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून परिक्षेला सुरवात झाली.प्रारंभ येथील आशा कार्यकर्त्या यांनी परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करून व सँनिटायजर मारून मास्क देण्यात आले.यावेळी कोगनोळी परिक्षा केंद्रात 71 मुलांनी व 56 मुलींनी एकुण 127 विद्यार्थ्यांनी परिक्षेला हजेरी लावली आहे.

यावेळी कोगनोळी हायस्कूलचे मुख्याध्यापक रविकिरण नवाळे म्हणाले कर्नाटकातील दहावीच्या परिक्षेसाठी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार परिक्षा सुरू आहे. अशी माहिती दिली.यावेळी शाळेतील शिक्षक ,शिक्षिका व कोगनोळीतील आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here