हंचिनाळ मराठी शाळेमध्ये कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा…आणि विद्यार्थी गिरीष कांबळे यांचा सत्कार…

राहुल मेस्त्री

1 नोव्हेंबर रोजी हंचिनाळ ता.निपाणी येथील मराठी मुला-मुलींच्या शाळेत कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा करण्यात आला..यावेळी प्रथमता कर्नाटक राज्याच्या नाड गीताने सुरुवात झाली.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन एम कुंभार सर यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस डी एम सी कमिटीचे अध्यक्ष सुशांत वंदूरे पाटील हे होते. आडी, हंचिनाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे अध्यक्ष बबन हवलदार यांच्या हस्ते भुवनेश्वरी मातेच्या प्रतिमेचे फोटो पूजन करण्यात आले… व याच शाळेत शिक्षण घेतलेला गुणवंत विद्यार्थी ज्याने इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांची उच्च शिक्षणासाठी चोनंम नॅशनल युनिव्हर्सिटी साऊथ कोरिया मध्ये पीएचडी अभ्यास क्रमासाठी निवड झाली आहे.

याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक ए.ए.भोसले सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांचे आभार एन.ए.दिंडी सर यांनी मानले.याप्रसंगी एस डी एम सी कमिटीचे सदस्य रिपब्लिकन पक्षाचे निपाणी विभागीय अध्यक्ष बाजीराव कांबळे, गंगाराम पणदे, बाबासो कांबळे, बाळासाहेब कांबळे, तानाजी जाधव यांच्या सह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here