कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवर तणाव…शिवसैनिकांना कर्नाटकात जाण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखलं…

कर्नाटकातील बेळगाव महापालिकेवर लाल पिवळा झेंडा लावल्याने आज दिनांक 8 रोजी बेळगाव मधील मराठी भाषेत यांच्या वतीने मोर्चाचे नियोजन केले होते .या नियोजनाला कोल्हापूर जिल्हा शिवसेना शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती मिळताच कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमा कोगनोळी तालुका निपाणी येथे कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.

यावेळी कोल्हापूर शिवसेना शिष्टमंडळ कर्नाटक सीमेवर येताच महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी त्यांना कर्नाटकात जाण्यापासून रोखलं आजच्या या मोर्चाला कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांना बेळगाव जिल्हा प्रशासनाने बेळगाव जिल्हा बंदीचा आदेश काढला होता. या आदेशाची प्रत कर्नाटक पोलिसांनी त्यांना सादर करताच त्यांनी या प्रतीची होळी केली .व आपण कर्नाटकात जाण्यास ठाम आहोत असे सांगितले.

या वेळी कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी शिवसेना शिष्टमंडळाला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले. यावेळी कर्नाटक पोलिसांमार्फत सी पी आय आय एस गुरुनाथ ग्रामीण उपनिरीक्षक बि एस तळवार, एएसआय तोलगी, पीएम गस्ती, अमर चंदनशिव यांच्यासह

अनेक पोलिस अधिकारी उपस्थित होते .तर महाराष्ट्र पोलिसांमार्फत पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, एपीआय दीपक वाकचौरे ,एपीआय सुशांत चव्हाण, पीएसआय निखिल खर्चे पीएसआय प्रितम कुमार पुजारी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त उपस्थित होता .याठिकाणी शेकडो शिवसैनिक होते.याचाच आढावा आमचे प्रतिनिधी राहुल मेस्त्री यांनी घेतल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here