रामटेक येथे कराओके गीत गायन “आशाओ के सूर”स्पर्धा…

रामटेक – राजू कापसे

कलासमर्पण संस्कृतिक संस्था व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रामटेक तालुका यांच्या संयुक्त विद्यमान्याने जिल्हा स्तरीय कराओके गीत गायन “आशाओ के सूर” स्पर्धा रामटेक येथे दि २१ नोवेंबर ला सकाळी ९ ते ७ वाजता दरम्यान रामटेक येथील आंबेडकर वार्ड येथे सुपर होंडा शोरूम पहला मजला येथे आयोजित करण्यात आलेले आहे.ही प्रतियोगिता त्यानंतर २२ तारखेला सावनेर,२४ ला भंडारा,२६ ला गोंदिया,२८ ला नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रतोयोगिता मध्ये प्रथम पुरस्कार २१००० रु,दृतीय पुरस्कार ११००० रु व ८ प्रतियोगिता विजेत्यांना प्रत्येकी १००० रु व प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे.तरी सर्वात जास्तीत जास्त लोकांना या स्पर्धा मध्ये भाग घ्यावा अशी विनंती कला समर्पण संस्कृतिक स्पर्धा चे रितेश कुमरे,सागर कुमरे,मंगेश काठोटे, संदीप मेश्राम,विपल्प राले व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रामटेक तालुका अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here