न्युज डेस्क – कपिल शर्माच्या शोमध्ये अनेकदा स्टार्स त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी जातात. असे पाहिले तर अक्षय कुमार सर्वात जास्त ‘द कपिल शर्मा शो’ ला जातो कारण तो एका वर्षात 4 ते 5 चित्रपट करतो, मात्र गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारचे कपिलसोबतचे नाते खराब असल्याच्या बातम्या येत आहेत.त्यामुळे काही वाद निर्माण झाले आहेत. ज्यात आता तो कपिलच्या शोमध्ये त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी जाणार नाही. या वृत्तांवर अक्षयने कोणतेही वक्तव्य दिलेले नाही, मात्र आता कपिल शर्माने मौन तोडले आहे.
कपिल शर्माने ट्विट केले की, अक्षय कुमारसोबत माझी जी काही समस्या होती, ती मी सोडवली आहे. कपिलने ट्विट केले- ‘माझ्या प्रिय मित्रांनो, मी मीडियामध्ये माझ्या आणि अक्षय पाजीबद्दलच्या बातम्या वाचल्या. मी पाजीशी बोललो आहे आणि सर्व काही व्यवस्थित झाले आहे. हे सर्व मिस कम्युनिकेशन होते. आता सर्व काही ठीक आहे. आम्ही लवकरच बच्चन पांडेच्या शूटिंगवर भेटणार आहोत. तो माझा मोठा भाऊ आहे आणि तो माझ्यावर कधीही रागावू शकत नाही. धन्यवाद.’
अक्षय कुमार कपिल शर्मावर नाराज…’बच्चन पांडे’च्या प्रमोशनसाठी शोमध्ये जाण्यास नकार…कारण जाणून घ्या
‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, अक्षय कुमारला मुलाखतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला विनोद संपादित करण्यास सांगितल्यापासून तो कपिल शर्मा आणि त्याच्या टीमवर नाराज आहे. मात्र, तोपर्यंत ही क्लिप सोशल मीडियावर लीक झाली आणि पाहताच ती व्हायरल झाली. यामुळे अक्षय कुमारला राग आला आणि कपिल शर्माने त्याचा विश्वास तोडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे त्याने आपल्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अश्या आशयाच्या बातम्या माध्यमांतून येत होत्या.
अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट 18 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाशिवाय अक्षय कुमारच्या खात्यात राम सेतू, रक्षाबंधन, पृथ्वीराज, सेल्फी आणि सिंड्रेला सारखे आणखी चित्रपट आहेत. गेल्या वेळी अक्षय कुमार सारा अली खान आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून दाद दिली.