बहुजनवादी विचारांचे खरे वैचारिक वारसदार कांशीरामजी…! बळीराजे पवार यांचे प्रतिपादन…

बुलढाणा – अभिमान शिरसाट

मौजे देऊळगाव मही येथे ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने बहुजन नायक कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने शिलाई मशीन क्लासेस चे उद्घाटन जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा बिल्डर बळीराजे पवार पत्रकार प्रकाश साकला ,प्रशांत डोंगरदिवे ,रमेश डोंगरे, प्रवीण काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बळीराजे पवार यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की ,जाती तोडो समाज जोडो अभियाना अंतर्गत कांशीरामजींनी समस्त बहुजन समाजातील अठरा पगड जाती जमाती एकत्र करून शासनकर्ती जमात बनविण्यासाठी अथक प्रयत्न केले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसह बहुजन समाजातील सर्व संत महापुरुषांच्या विचारांचे खरे वैचारिक वारसदार कांशीराम साहेब हेच आहेत असे प्रतिपादन बळीराजे पवार यांनी केले.

यावेळी महिला ह्या स्वबळावर उभ्या राहून स्वयंरोजगार करण्याची संधी ऋणानुबंध समाज विकास संस्था व भारतीय मानवाधिकार संघटना यांनी देऊळगाव मही येथे करून दिल्याबद्दल कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित असलेले बळीराजे पवार, पत्रकार प्रकाश साकला, प्रशांत डोंगरदिवे ,रमेश डोंगरे ,प्रवीण काकडे यांनी आयोजकांची प्रशंसा केली.

तसेच सर्व मान्यवरांचे समयोचित भाषणे झाली नंतर भारतीय मानव अधिकार संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांना संघटनेची किट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली .या कार्यक्रमाचे ऋणानुबंध संस्थेच्या सचिव सौ.रुपाली डोंगरदिवे, जिल्हा सचिव जाकेराबी शेख यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी संतोष कदम, अनिल मोरे, दिनेश आढाव, शेख राजू , कल्पना केजकर, संतोष धुरंदर यांच्यासह पदाधिकारी तसेच परिसरातील महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here