खापा येथे कन्हान नदिला महापूर,१९९२ नंतर २८ वर्षांनी एवढा महापूर,खापा झाले जलमग्न…

खापा या गावाला कन्हान नदीच्या महापुराने वेढले आहे. गेल्या चार दिवसांपासुन सुरु मध्यप्रदेश व महाराष्ट्रात सुरु असलेल्या संततधार अतिवृष्टीमुळे कन्हान नदिच्या पाण्याची पातळी निरंतर वाढतच आहे. त्यामुळे खापा येथील काही भाग तलाव बनला आहे. १०० च्या वर घरे पाण्यात डुंबली आहेत. पुष्कळशी घरे अर्धवट बुडाली आहेत. खुपशा घरात पाणी शारले आह्रैत.

खापा या गावाला याआधी १९९२ वर्षी कन्हान नदीने घेरले होते. आता तब्बल २८ वर्षांनी पुन्हा खापावासियांना या महापुराच्या भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
नगरषरिषद मात्र या आपात स्थितीत सपेशल फेल ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. न प ची व्यवस्था गौंधळली आहे.

धावपळ आहे.मात्र नियोजना अभावी पुरेशी मदद नागरिकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारच्या रात्री काही लोकांना शाळेत व मंदिरात हलविण्यित आले होते.परंतु सकाळी काही घरात पाणी शिरल्याने लौकं आपले सुरक्षित ठिकाणी सामान हलवु लागले आहेत. एकंदरीत परिवार घाबरलेले,गोंधळलेले आहे. पाणी सतत वाढत

असल्याने,घरात शिरल्याने वस्तुंना नुकसान होत आहे. काही सामान सुरक्षिततेच्या काळजीत आहे. प्रशासनाचुब मदत मात्र तौकडी पडत आहे.लक्ष्मीकांत उमाळे, सुरज उमाळे,आकाश उमाळे, विक्कि मुटकुळे, अंकुश कापसे,अन्वेश कापसे, तुषार कापसे,तेजस कापसे, श्रेयश कापसे,प्रतिक भुरडे,अक्षय लखपती,मंत्रमुग्ध तातडे, आदि यांनी भरपाण्या मधे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here