कंगना राणावतला भारत सरकारने दिलेले पद्मश्री पुरस्कार रद्द करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा – मिरज युवक राष्ट्रवादी काँग्रेस…

सांगली – ज्योती मोरे

कंगना राणावत यांनी केलेल्या भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे. खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले यांच्या या वक्तव्याच आम्ही युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो व या कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देश स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भारतात लाखो स्वातंत्र्य शूरवीर सेनानी व सर्व भारतीयांचा अवमान आहे.

भारत स्वातंत्र्यासाठी अनेक योद्धे आपल्या जीवनाचा त्याग करून होतातम्या पत्करले देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली या सर्व स्वातंत्रसेनानीचा अपमान केलेला आहे याच्यावर गुन्हे दाखल करून तुरुंगात पाठवावे अशी मागणी आज मिरजेत युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मिरज प्रांतद्वारे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज, शहराध्यक्ष शहाबाज कुरणे, शिवराज्य सफाई कर्मचारी सेना मिरज शहर अध्यक्ष प्रशांत ढंग, अदनान पठाण,अमन मुश्रीफ, जयद शेख,वसीम सय्यद,शिराज शिकारी,परवेज काजी,सय्यदसाब खतीब,तनवीर मुलानी,नजीर पिरजादे,आधी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here