कंगनानं मुख्यमंत्र्यांचा ऐकेरी भाषेत उल्लेख केल्या प्रकरणी गुन्हा दाखल…

न्यूज डेस्क – अभिनेत्री कंगना राणावत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढत आहे. कंगना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सतत हल्ला करत आहेत. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर बुलडोझर चालवले पण यामुळे कंगनाच्या हल्ल्याची धार कमी झालेली नाही.

कंगनाने आज उद्धव ठाकरे यांना वंशाचा नमुना दिला आणि शिवसेनेने सोनिया सेना देखील म्हटले.सध्या राज्यात चर्चेचा मुद्दा ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना विरुद्ध शिवसेना अशी वाद उफाळून आला आहे. कंगनानं मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या विधानांवरून शिवसेनेनं टीका केली होती. त्यानंतर हा वाद चिघळत गेला.

यात महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग पाडल्यानंतर तिने संताप व्यक्त केला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ‘अरे तुरे’ची भाषा वापरली होती. याप्रकरणी आता कंगनावर मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.

अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईचा मुद्दा जोर धरताना दिसत आहे. कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेच्या पथकानं बुधवारी हातोडा चालवला. त्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या कंगनानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कंगनानं त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. कंगनानं केलेल्या या टीकेवर नाराजी व्यक्त होत असताना मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नितीन वसंत माने असं तक्रार देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

कंगनानं मुख्यमंत्र्यांवर टीका करताना अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप विक्रोळी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीसोबत मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका करतानाचा कंगनाच्या व्हिडीओचे ट्विटही जोडण्यात आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here