“कलावंतांनी सावध होणे गरजेचे,भाजप चित्रपट आघाडी चा पुणे शहराध्यक्ष रोहन मंकणी यांच्या फसवेगिरीमुळे कला क्षेत्राला जबर धक्का -बाबासाहेब पाटील: प्रदेशाध्यक्ष- राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग…

कलावंत आपल्या कलेतून प्रत्येकच्या आयुष्यात विवीध रंग भरत असतो,दरम्यान कलावंत हा त्याच्या अडचणी व न्याय हक्कासाठी संघटनामध्ये खूप विश्वासने सहभागी होतो,दरम्यान नेहमी लोकांच्या भलासाठी कला सादर करतांना कलावंतची कुठे फसवणूक होता कामा नये,ही जबाबदारी प्रत्येकाची आहे.

तर BJP ने सुद्धा मताच्या राजकरांसाठी कलाकारांचा वापरू करून नये तर कलावंताने सुद्धा आपला वापर होऊ देता काम नये,कारण कलावंतचा खरा धर्म म्हणजे भूलथापांना बळी न पडता व जात पात पंत गुरफटून न जाता.कालाधर्मचा विचार करून षड्यंत्र पासून लांब राहील पाहिजे, करण पुणे शहरातील भाजप चित्रपट

आघाडीच्या शहराध्यक्षा ने केलेल्या कृत्यामुळे कलाक्षेत्राला निश्चितच गालबोट लागले आहे. केंद्रातील भाजप सरकार लोकांच्या भावनेशी खेळ चालविला आहे,दिवसने दिवस महागाई गगनाला भिडली आहे,पेट्रोल डिझेल चे भाव शंभर रुपये पार करण्याच्या पलीकडचे आहे,तर गॅस चे भावने हजारी गाठली आहे,

दुसरीकडे आपलं सरकार असल्याचे फसव्या जाहिराती करून बीजेपी सरकार खासगीकरणाचा घाट घालत आहेत तर अनेक कंपन्या विक्रीस काढल्या अशने निश्चितच देशाची बर्बादी ही काही काळातच निश्चित आहे,त्यामुळे आता सर्वांनी जागरूक होण्याची गरज आहे दरम्यान गेले दोन दिवस बँक खाजगीकरणविरुद्ध बँक कर्मचारी

यांचा संप चालू आहे. भाजप सरकार म्हणत आहे बँकांच्या भल्यासाठीच हा निर्णय आम्ही घेत आहोत. मात्र याच्या उलट शहरात भाजपचेच नेते मात्र बँकांचीच फसवणूक करत आहेत. ही अतिशय निषेधार्थ बाब आहे. पुणे शहरात नामांकीत बँकेतून निष्क्रिय खाते यांची माहिती अनाधिकृतपणे मिळवून ती बाहेरच्या

व्यक्तीला विकून 216 कोटी 29 लक्ष रुपयांचा गंडा घालण्याचा या टोळीचा प्रयत्न पुणे सायबर क्राईम पोलीस यांनी हाणून पाडला आहे. या बद्दल मी त्यांचे आभार मानतो. भाजप चित्रपट आघाडी चा पुणे शहराध्यक्ष रोहन मंकणी हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. भाजप नेत्यांचे हे वागणे म्हणजे खायचे दात वेगळे

आणि दाखवायचे वेगळे अशी गत आहे. देशातील जनता आता या लबाड लांडग्याना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. तशी वेळच या भाजपवाल्यांनी पूर्ण देशावर आणली आहे. आणखी कोण कोण मोठे मासे या गुन्ह्यात सहभागी आहेत याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी करण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांकडे मागणी करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here