हालसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने कोगनोळीत “स्मार्ट वुमन ऑफ द इयर” स्पर्धेचे नियोजन…

राहुल मेस्त्री
कोगनोळी तालुका निपाणी येथे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री हालसिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने बुधवार दिनांक दहा रोजी खुल्या “स्मार्ट वुमन ऑफ द ईयर” 2020 – 21 या स्पर्धेचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले

असल्याची माहिती गर्ल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पुनम मुल्ला यांनी दिली. यावेळी त्या म्हणाल्या कोगनोळी सह परिसरात प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेमध्ये महिलावर्गाला खुले व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

यामध्ये वेशभूषा सादरीकरण, प्रश्नमंजुषा व फनी गेम्स अंतर्गत गुणदान करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये पार पडणार असून विजेत्याला “स्मार्ट वुमन ऑफ द इयर” 2020- 21हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धे मधील प्रथम क्रमांक सोन्याची नथ ,द्वितीय क्रमांक पायातील जोडवी

तृतीय क्रमांक चांदीचे आरतीचे ताट अशा प्रकारचे बक्षिसे वितरण करण्यात येणार आहे…सकाळी दहा वाजता या स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही स्पर्धा संपताच न्यू इंग्लिश मीडियम स्कूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 करनूर फाटा कोगनोळी या स्पर्धेच्या ठिकाणीच संपन्न होणार आहे

..तरी कोगनोळी सह परिसरातील इच्छुक महिलांनी या स्पर्धेसाठी सहभागी होऊन अनोख्या स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे…
यावेळी संस्थेच्या सचिव कस्तुरी कोळेकर ,इंग्लिश मीडियम स्कूल प्राचार्य दीपक सर ,नवोदय करिअर ॲकॅडमीचे प्रिन्सिपल मीनाक्षी वाडकर

,कोऑर्डिनेटर अरुणा कदम ,स्मिता करनुरे, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते… या स्पर्धेत पुरुषांना प्रवेश नसल्यामुळे मोकळ्या वातावरणात महिलांना आपला आविष्कार सादर करण्यासाठी मदत होणार आहे तर या स्पर्धेची नाव नोंदणी गर्ल हायस्कूल कोगनोळी येथील सुरू आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here