दागिने, मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या कागल पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

कोल्हापूर – राहुल मेस्त्री

गेल्या काही दिवसापासून कागल तालुक्यातील काही परिसरामध्ये चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या मध्ये चिंतेचं वातावरण होते. त्यामुळे कागल पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कंबर कसली असता दोन आरोपींना ताब्यात घेतले.असता जवळपास पाच लाख दोन हजार पाचशे सत्तर रुपयांची मुद्देमाल हस्तगत करण्यात आली आहे.

सदर आरोपी निखील प्रकाश सातवेकर,वय 26 रा.पिंपळगाव(खुर्द)ता.कागल आणि आरोपी अक्षय उर्फ बबलू याळु पसारे वय 24 रा.लिंगनुर(दुमाला शाहुनगर)ता.कागल या आरोपींनी मोटारसायकल चोरी, पाण्याच्या मोटार चोरी,घरफोडी, चैन स्नैचिंग असे अपराध करत होते.

याप्रकरणी कागलचे पोलिस उपनिरीक्षक निखिल करचे,उपनिरीक्षक प्रितमकुमार पुजारी यांच्या सह विजय पाटील, बिनायक औताडे, दिग्वीजय अनंत कोंडरे,रोहन बाकरेकर,महेश पाटील, संग्राम लांडगे यांनी तपास केला असता सदर आरोपीनी कोल्हापूर जिल्हयात विविध ठिकाणी घरफोडी, चोरी व चैन स्नैचिंग व इलेक्ट्रीक पाण्याचे मोटर चोरी केल्याची कबुली दिली.

व अधिक तपासात जिल्ह्यातील हुपरी,राधानगरी, इस्पुरली,आष्टा या पोलीस स्टेशन मध्येही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.. तर या आरोपींना कागल पोलिसांनी भारतीय दंड वसूल संहिता कलम रजि नं. २८६/२०२०.३०७,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर अटक आरोपींनी चोरी केलेले दागीने काय केले याची माहिती घेतली असता त्यांनी चोरी केलेले दागीने लॉकडाऊनच्या काळात घरातील लोक आजारी आहेत .व पैशाची अडचण आहे. आणि घरातीलच सोन्याचे दागीने आहेत असे खोटे कारणे सांगुन कागल येथील सोनारास दिले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे चोरीस गेलेले सोन्याचे दागीने एकुण ८३ गॅम ५०० मिली,तसेच दोन मोटर सायकल, सहा पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटर असा एकुण ५,०२,५७०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आली आहे.

तरी या आरोपींनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात अशा प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता आहे .तरी आपल्या पोलिस स्टेशनमध्ये रेकॉर्डवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल असतील संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क साधून सदर आरोपी यांचा माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट सो कागल यांचे कोर्टातून ताबा घेऊन आरोपी यांच्या कडे तपास करण्यात यावा अशी माहिती कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here