कागल सिमा तपासणी नाका आजपासून खुला…

राहुल मेस्त्री

पुणे बंगळुरू महामार्ग क्रमांक चार वर गेल्या 23 मार्चपासून ते 31 आँगस्ट पर्यंत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कागल जि.कोल्हापूर येथील महाराष्ट्र व कर्नाटक अंतर राज्य सिमा अत्यावश्यक सेवा वगळता बंद होती.

त्यामध्ये काही महिण्यानंतर नियमात शितिलता ठेवून बंदी कायम होती. राज्यात जायचे असेल ई पास काढून जावे लागत होते. यामध्ये पुढे काही दिवसांनी औद्योगिक कामगारांना कामावर जाण्यासाठी काही सवलती दिल्या होत्या.

या सिमा तपासणी नाक्यावर पोलीस विभागातील अधिकारी गेल्या पाच महिन्यापासून राज्यात कोरोना व्हायरसचा शिरकाव होऊ नये म्हणून आपले प्रामाणिक कर्तव्य बजावत होते.लाँकडावुन मुळे व सिमा बंदी मुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत आली आहे.

तिला चालना देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने अंतर राज्य सिमेवरील बंदी उठवण्याचे पत्रक काढून निर्देश दिले आहेत.तर या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशाला हिरवा कंदील दाखवत शेजारच्या कर्नाटक सरकारने कोगनोळी येथील अंतर राज्य सिमा बंदी याअगोदरच उठवली आहे.

त्यापाठोपाठ महाराष्ट्र शासनाने देखील आज दि.1 सप्टेंबर पासून महाराष्ट्र- कर्नाटक अंतर राज्य सिमा तपासणी नाका खुला केला आहे.अशी माहिती कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी दिली.यामुळे दाक्षिणात्य राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात या राज्यात प्रवास करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here