बिलोली:-रत्नाकर जाधव
बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील गरीब कुटूंबात जन्मलेल्या संगीतकार प्रा.संदीप भुरे यांच्या संगीत दिग्दर्शनात तयार झालेल्या “का रं देवा ” या चित्रपटाचे प्रक्षेपण आज ( ११ फेब्रुवारी) झाला.सामान्य कुटूंबातील बँड वादक ते संगीतकार असा प्रवास करणाऱ्या संदीप भुरे यांचा हा पहिलाच संगीतबद्ध केलेला चित्रपट आहे.
आई भाजीपाला विक्रेते वडील सुतार काम करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या अशी अतिशय हलाखीची कौटूंबिक परिस्थिती असतांना केवळ संगीत व गाण्याची आवड व मनात असलेली जिद्द या जोरावर बिलोली तालुक्यातील मौ.आदमपूर येथील संदीप भुरे या युवकाने बँड वादक ते चित्रपट संगीतकार अशी झेप घेतली आहे.त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या ” का रं देवा ” हा मराठी चित्रपट आज दि.१० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.विशेष म्हणजे या चित्रपटासाठी पार्श्व गायन दिगग्ज गायक आदर्श शिंदे यांनी या चित्रपटात गायलेल्या गाण्यांना प्रा.संदीप भुरे यांनी संगीतबद्ध केले आहे.यापूर्वी भुरे यांनी अनेक अल्बम बनवले असून ते अल्बम ही लोकप्रिय झाले आहेत.
या मध्ये टी-सिरीज ऑडिओ कंपनी कडून ही एक अल्बम बनवला होता.सतत ध्येय ठेवणाऱ्या बँड वादक ते चित्रपट संगीत दिग्दर्शना पर्यन्तचा असा कडतर प्रवास प्रा.संदीप भुरे यांनी यशस्वी केला आहे.बिलोली तालुक्यातून पहिल्यांदाच बँडवादक ते चित्रपट संगीत दिग्दर्शक झालेल्या त्यांच्या भाजीपाला विक्रेती आई व सुतारकाम करून ग्रह प्रपंच चालवणाऱ्या मात्ता-पित्यांनी ही संदीपच्या इच्छांना कधी मुरड घातली नाही.
संदीप भुरे यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे तालुक्याचे नाव चित्रपट क्षेत्रात लौकिक झाले आहे.”का रं देवा “हा चित्रपट राज्यातील अनेक चित्रपट ग्रहासह नांदेड येथील लिबर्टी सिनेमागृहात व मुखेड येथील एक सिनेमागृहात आज प्रेक्षकांच्या भेटीला प्रदर्शित होत आहे.