पातूर येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न;तहसीलदार दीपक बाजड यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान…

पातूर – निशांत गवई

गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ताळेबंदीच्या काळात पोलीस, महसूल विभाग,आरोग्य विभाग,सफाई कर्मचारी गृहरक्षक दल अशा अनेकांनी आपले कर्तव्य बजावत मोलाचे योगदान दिले, त्यांच्या या कार्याबद्दल अनेक संघटनांनी त्यांचा सन्मान केला व पत्रकार बांधवांनी त्यांच्या बातम्या प्रसिद्ध करून आपल्यापरीने त्यांना सन्मानित केले.

कोरोना महामारीदरम्यान सामान्य जनतेमध्ये अफवांमूळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत खरी जनजागृती करण्याचे काम वास्तविक पाहता पत्रकारांनी केले. नेमकी हीच बाब हेरून बेरार की आवाज व BKA न्यूज 24 चे संस्थापक तथा मुख्य संपादक अनवर अहमद खान यांनी पुढाकार घेऊन पत्रकारांना कोरोना योद्धा पुरस्कार देण्याचा मानस पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांना बोलून दाखविली.

त्या अनुषंगाने आज दि.25/8/2020 रोजी पातूर तहसील कार्यालयात तहसीलदार दीपक बाजड,नायब तहसीलदार सैय्यद एहसानुद्दीन, संपादक अनवर अहमद खान यांच्या उपस्थितीत बेरार की आवाज या वृत्तसंस्थेकडून पातूर तालुक्यातील पत्रकारांना प्रशस्ती पत्र देऊन या कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी तालुक्यातील व शहरातील सर्व पत्रकार तथा कंट्रोल डीलर,डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here