पातुर तालुक्यातील पत्रकारांना मिळाले कोरोना सुरक्षा कवच…

पातूर – निशांत गवई

समाजाच्या भल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून वृत्तांकन करणाऱ्या पातुर तालुक्यातील पत्रकारांना कोरोणा सुरक्षा रक्षक कवच विमा संरक्षण प्रदान करण्यात आले. रविवारी दुपारी एक वाजता सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटन सचिव कृष्णाभाऊ अंधारे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलं होते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी बाळापुर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी तहसीलदार दीपक बाजड, शहीद कैलास निमकंडे स्मारक समितीचे अध्यक्ष काशीराम निमकंडे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे,श्रीकृष्ण पाटील,सपना राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे होते.

कोरोना कालावधीमध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तीनशेहून अधिक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला. यातील अनेकांचे विमा नसल्यामुळे पत्रकारांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना हलाखीचे जीवन जगण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे.

त्यामुळे आगामी येऊ घातलेल्या तिसर्‍या लाटेत वृत्तांकन करताना पत्रकारावर दुर्दैवी प्रसंग ओढवला तर त्यांना कोरोणा विमा संरक्षण असावे यासाठी शिर्ला येथील कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटन सचिव कृष्णाभाऊ अंधारे यांनी पातुर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना कोरोना सुरक्षा विमा संरक्षण पॉलिसी एका विशेष कार्यक्रमांतर्गत प्रदान केली.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांना कोरोणा योद्धा म्हणून शाल श्रीफळ देऊन त्याबरोबरच कोरोना सुरक्षा कवच पालीसी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.यावेळी बाळापुर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी पत्रकारांची भूमिका कोरोना काळामध्ये अतिशय उल्लेखनीय राहिली असल्याचे आपल्या भाषणातून व्यक्त केले.

यावेळी कृष्णाभाऊ अंधारे बोलताना म्हणाले की वृत्तांकन करताना पत्रकारांवर मृत्यूसारखी दुर्दैवी वेळ आली तर पत्रकाराचा परिवार उघड्यावर येतो अशावेळी पत्रकारांचे कोरोना सुरक्षा पॉलिसी अत्यंत असणे आवश्यक होते त्यामुळे पत्रकारांनी प्रती असलेली कृतज्ञता यामुळेच सदर उपक्रम पत्रकारांसाठी आयोजित केला होता. यावेळी नारायण अंधारे, उमेश देशमुख, प्रदीप काळपांडे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जया भारती यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामा मानकर, सपना राऊत ,बब्बू डॉन, प्रभू गाडगे, कुलदीप अंधारे देशपांडे मॅडम आदींनी अथक परिश्रम घेतले इन्फो बाक्स.अकोल्याच्या मोहता मिल स्मशानभूमीत कोणत्याही स्वार्थाशिवाय स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या आमिर खान ,अफसर भाई ,दीपक शिंदे यांच्याप्रती या कार्यक्रमात विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

प्रत्येकी अकरा अकरा हजार रुपये रोख स्वरूपात दिले जातील अशी माहिती कृष्णा अंधारे यांनी यावेळी दिली कार्यक्रम ला संतोष गवई, निशांत गवई, उमेश देशमुख, मोहन जोशी, छोटू काळपांडे, मो. फरहाण, स्वप्नील सुरवाडे, प्रमोद कढोणे, देवानंद गहिले, किरण निमकांडे, रामेश्वर वाडी, जयवंत पुरुषोत्तम, नतिक शेख, संगीता इंगळे, साजिद, प्रवीण दांडगे पंजाबराव इंगळे आदी. पत्रकार उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here