महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेत दानापूर येथील पत्रकारांची नियुक्ती…

दानापुर – गोपाल विरघट

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तेल्हारा तालुका तथा हिवरखेड शाखा नावीन्यपूर्ण असे उपक्रम राबवित असून पत्रकार संघात नवचैतन्य निर्माण करीत आहे, समाजातील ज्वलंत समस्यांचा पाठपुरावा करीत असून पत्रकार हा समाज जागृतीचे मौलिक कार्य अधिकाधिक करून लोकशाहीचा खरखुरा आधारस्तंभ बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे.

सदर संघटनेचे कार्य तालुकाध्यक्ष सिद्धार्थ गवारगुरू तथा हिवरखेड शहराध्यक्ष गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनात सुसूत्रबद्ध पद्धतीने नियोजनपूर्वक संघटना चैतन्यमय पद्धतीने वाढविण्याचे कार्य करत आहे, जिथं कुठं अन्याय होतो तिथं अन्यायला वाचा फोडण्यासाठी संघटना आपल्या लेखणीच्या माध्यमातून तत्पर असते. ते मग कामचुकार कर्मचारी असतील,

रेंगाळलेली कुठली शासकीय कामे असतील यावर जोरदार प्रहार या संघटनेद्वारे केल्या जाते, नेमक्या याच गोष्टींवर भाळून दानापूर येथील अकरा पत्रकारांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तेल्हारा तालुक्याच्या अध्यक्षाशी संपर्क करून संघटनेसोबत काम करण्याचे ठरविले त्यात क्षणाचाही विलंब न करता तेल्हारा तालुका कार्यकारिणीने एका छोट्याखानी कार्यक्रमाचे आयोजन करून या अकराही पत्रकारांना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना संघटनेत नियुक्ती दिली.

नियुक्त करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये महादेवराव रामकृष्ण वानखडे यांची तालुका उपाध्यक्ष, तर सुनील कुमार धुरडे यांची तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली तसेच तालुका आयोजक पदी शे. राजु शे. नबी ता. सदस्यपादी राजेंद्र बळीराम तायडे यांची नियुक्ती करण्यात आली.

यातच तालुक्यातील मोठ्या गावांपैकी असलेले गाव दानापूर येथे स्वतंत्र ग्रामशाखा स्थापन करण्यात आली ज्यामध्ये अध्यक्षपदी प्रमोदभाऊ पुंडलिकराव हागे, उपाध्यक्षपदी नंदकिशोर एकनाथ नागपुरे, संघटकपदी गोपाल शालिग्राम विरघट , सचिव पदी प्रेमकुमार काशिनाथ गोयनका, कोषाध्यक्ष पदी संजय किसनराव हागे तर कार्याध्यक्ष पदी रवी साहेबराव वाकोडे,

व सह संघटक पदी रवींद्र बापूराव ढाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली नवनियुक्त सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केलीत ज्यामध्ये संघटनेप्रति कठीबद्ध राहण्याचे व समाज हीतोपयोगी उपक्रम राबविण्याचे आश्वसन दिले निवड करते वेळी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ गवारगुरू, ता. सचिव सुनील तायडे, सहसचिव सागर खराटे, ता. संघटक प्रा. विकास दामोदर, सह संघटक प्रेम वानखडे, कोषाध्यक्ष प्रविण वानखडे व हिवरखेड शहराध्यक्ष गजानन राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास दामोदर तर आभार प्रदर्शन सुनील तायडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here