लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात पत्रकाराचे लेखन हे न्यायासाठी, सत्यासाठीचं :- पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी…

करवीर पूर्व पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रम…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

पत्रकारांच्या लेखणीत वास्तव मांडण्याची ताकत आहे.रंजल्या गांजल्या लोकांच्या प्रश्नांची पोटतिडकीने सोडवणूक करण्याची क्षमता आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या रक्षणासाठी पत्रकाराचे लेखन हे  न्यायासाठी,सत्यासाठी असते. पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करावे.पोलीस प्रशासन व पत्रकार यांच्या कडून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिला जातो.यामुळे पत्रकारांच्या कार्याचा व लेखणीचा गौरव प्रेरणादायी आहे. असे मत करवीर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी केले.

कणेरीवाडी येथील हॉटेल गारवा इंटरनॅशनल येथील सभागृहात करवीर पूर्व पत्रकार संघ,(ता.करवीर ) संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य  आयोजित पत्रकार दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच महादेव पाटील,सपोनि कविता नाईक,एस राजू माने,यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात सर्व पत्रकारांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते  सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन सातपुते यांनी प्रास्ताविक केले, उपाध्यक्ष विजय कदम यांनी आभार मानले तर प्रा. सुरेश मसुटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करवीर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी होते.प्रमुख पाहुणे म्हणून उजळाई वाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सपोनि कविता नाईक, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार,गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील,

एस फोर ए चॅरिटेबल ट्रस्ट व एस फोर ए ग्रुप ,उजळाईवाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा अध्यक्ष एस राजू माने, बांधकाम व्यावसायिक श्रीनिवास माने,करवीर पूर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन सातपुते, उपाध्यक्ष विजय कदम,सचिव संजय वर्धन,खजाणीस राजेंद्र सुर्यवंशी, सर्व सदस्य,सभासद, सर्व इलेट्रॉनिक माध्यमाचे व प्रिंट मीडिया माध्यमाचे प्रतिनिधी, पत्रकार,वार्ताहर उपस्थित होते.

करवीर पूर्व पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रम प्रसंगी करवीर  उपविभागीय पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी,राजू माने,सपोनि कविता नाईक,अध्यक्ष मोहन सातपुते, पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार,उपाध्यक्ष विजय कदम,सरपंच महादेव पाटील व सर्व संघाचे पत्रकारआदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here