जनमाध्यम धमकी प्रकरण…पातूर तालुक्यातील पत्रकारांनी नोंदविला निषेध…

मुख्यमंत्री,गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांना पाठविले निवेदन…

पातुर :- अमरावती जिल्ह्यातून प्रसिद्ध होणाऱ्या सुप्रसिद्ध जनमाध्यम दैनिकाच्या वृत्तसंचालक अभिराम देशपांडे व अकोला आवृत्ती उपसंपादक समीर ठाकूर यांना व्हाट्सएपवर फोन करून  धमकी दिल्या प्रकरणी पातूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी सदर घटनेचा निषेध नोंदवला असून या प्रकरणी संबंधित अधिकारी वर्गावर कारवाईची मागणी केली. या संबंधित पातूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री,गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांना निवेदन सुद्धा पाठविण्यात आले. 

अमरावती येथील स्थानिक दैनिक जनमाध्यम या वर्तमानपत्रात गुटख्या विषयीची बातमी प्रकाशित झाली त्या बातमीमध्ये काही आक्षेप पोलिस अधिकाऱ्यावर घेण्यात आले ते आक्षेप  चुकीचे असतील तर त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित वर्तमानपत्राकडे खुलासा करणे अभिप्रेत होते.  मात्र असे काहीही न करता अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी संबंधित बातमी दार अकोला आवृत्ती उपसंपादक समीर ठाकूर यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांना हजर होण्यास बजावले  व गुन्हा नोंदवुन सहा महिने तुरुंगात सडविण्याची धमकी दिली तर पोलिस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी या संदर्भात पत्रकारा विरूद्ध गुन्हा नोंदविण्याची भाषा वापरली हा प्रकार पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून त्याचा पातूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी अ. कुद्दुस शेख , प्रदीप काळपांडे, निखिल इंगळे, उमेश देशमुख, निशांत गवई, मोहन जोशी, सतीश सरोदे, संगीता इंगळे, नातिक शेख, डिंगाबर खुरसडे, स्वप्निल सुरवाडे, किरण कुमार निमकंडे, सय्यद साजिद हुसेन,  श्रीकृष्ण शेगोकार, अनवर खाँन, प्रमोद कढोणे, सचीन ढोणे, राम वाढी, दुलेखाँ , अविनाश गवई ,  रमेश देवकर, गोपाल बदरखे , सुनील गाडगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here