जम्मू- काश्मीर | पुलवामा परिसरात दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण…

डेस्क न्यूज – आज पहाटे जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील पानगाव ता: बार्शी येथील जवान सुनिल काळे यांना वीरगती मिळाली.

पुलवामा परिसरात बंडजू येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पानगाव,येथील सीआरपीएफचे जवान सुनील काळे हे शहीद झाले आहेत.

आज(दि.२३) पहाटे लष्कर, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेत पुलवामा भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना या दरम्यान, तेथील बंडजू येथे दहशतवाद्यांशी चकमक उडाली. यात सीआरपीएफ जवान सुनील काळे यांना वीरमरण आले.

काळे हे सोलापूर जिल्ह्यातील पानगाव (ता. बार्शी) येथील मूळ राहणारे होते. ते शहीद झाल्याची माहिती मिळताच पानगाव व आसपासच्या अनेक गावांमध्ये स्वयंस्फुर्तीने ‘बंद’ पाळून शहीद काळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here