जळगावात अखेर बहुमतातील भाजपा तोंडघशी…शिवसेनेचा महापौर विजयी…!

मनोहर निकम, महाव्हाईस ब्युरो

महाराष्ट्रातील जळगाव महानगरात सत्तेत बदल झाला आहे. बहुमतातील भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्यात शिवसेनेला यश आले असून माजी मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का मानला जात आहे. भाजपच्या २९ नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात शिवसेनेच्या समर्थनार्थ मतदान केले होते.

विशेष म्हणजे ७५ पैकी ५७ नगरसेवक हे भाजपचे आहेत.शिवसेनेच्या महापौर उमेदवाराला ४५ मते मिळाली तर भाजप उमेदवाराला केवळ ३० मते मिळाली.जळगावात गेल्या ८ दिवसापासून भाजपा नगरसेवकांनी महानगर पालिकेमध्ये बंडखोरी सुरू केली आणि शिवसेनेने हातमिळवणी केली.अन भाजपचे नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करून शिवसेनेत सामील झाले.

या सर्व घडामोडीमध्ये भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आज ऑनलाईन मतदानाच्या जोरावर शिवसेनेच्या जयश्री महाजन ३८ हा बहुमताचा आकडा पार करत महापौर झाल्या.तर कुलभूषण पाटील हे उपमहापौर पदी विजयी झाले.

शिवसेनेच्या तंबूत गेलेल्या फुटीर नगरसेवकांना व्हीप न बजावता आल्यानं भाजपाने कोर्टात याचिका दाखल केली होती.परंतु,औरंगाबाद खंडपीठाने भाजपची याचिका फेटाळून लावत कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक ऑनलाइन घेण्यासाठी कोर्टाने आदेश दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here