विकृत पोलिसाचा प्रताप…म्हणून तरुणावरच केला अनैसर्गिक अत्याचार…सांगली जिल्ह्यातील खळबळजनक घटना…

सांगली – ज्योती मोरे.

इस्लामपूर पोलीस ठाण्यात नेमुकीस असलेला खाकीला काळिमा असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने इस्लामपूर मधील महाविद्यालयीन तरुणा बरोबर अनैसर्गिक अतिप्रसंग केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. त्या विकृत पोलिसा विरोधात तो काम करत असलेल्या पोलीस ठाण्यातच इस्लामपूर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, इस्लामपूर पोलीस ठाण्यात नेमुणकीला असलेला पोलीस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर रा. राजेबागेश्वर, इस्लामपूर व बरोबर असलेले आणखीन एक पोलीस कर्मचारी असे दिनांक – २८.१०.२०२१ रोजी पहाटे ०३ वा. च्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना पिडीत मुलगा हा त्याच्या मैत्रिणीच्या घरी घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने गेला होता पुन्हा त्याच्या वस्तीगृहात जात होता असताना आरोपी हणमंत देवकर व एक पोलीस कर्मचारी यांनी त्यास अडवून त्यास आत्ता कोठून आलास इथे काय करतो असे विचारले असता पिडीत याने मैत्रिणीला भेटून आलो आहे असे सांगितले.

त्यावेळी आरोपी हणमंत देवकर याने पिडीतास संपुर्ण माहीती मागितली असता पिडीताने सर्व माहीती दिली त्याचा मोबाईल नंबर ही दिला. दरम्यान २९ रोजी पिडीत याला आरोपी हणमंत देवकर याने मोबाईलवरून फोन करून कॉलेजच्या गेटवर भेटायला ये असे सांगितले.

त्यानंतर पिडीत हा आरोपी हणमंत देवकर यास भेटायला गेल्यावरवर त्यास मैत्रिणीच्या प्रेम प्रकरणावरून धमकावले व धमकावून पैशाची मागणी केली त्यावेळी त्याने घाबरून त्याच्या कॉलेजमधील मित्रांकडून ४००० /- रूपये उसणे घेवून पोलीस हणमंत देवकर यास दिले. परंतु त्याचे समाधान झाले नाही. आरोपी हणमंत देवकर याने पिडीतास तुझ्या मैत्रिणीचा नंबर मला दे, व तिला माझ्यासोबत सेक्स करायला सांग असे सांगितले.

त्यावेळी पिडीताने ती मुलगी चांगली आहे व तसे करण्यास स्पष्ट नकार दिला.त्यावेळी आरोपी हणमंत देवकर याने पिडीतास तु मला तुझ्या मैत्रिणीसोबत जर सेक्स करायला देत नसशील तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार असे म्हणाला. त्यावर पिडीत मुलगा घाबरला. आरोपी हणमंत देवकर याने पिडीतास तुझ्या रूमवर चल, मला तुझ्यासोबत सेक्स करायाचा आहे असे सांगितलेनंतर त्याने पिडीताने आपल्या मित्रास दुसऱ्या रूममध्ये जाणेस सांगितले.

आरोपी हणमंत देवकर व पिडीत मुलगा असे पिडीत मुलाचे रूममध्ये गेले. तेथे आरोपी हणमंत देवकर याने पिडीत महाविद्यालयीन तरुणा बरोबर अनैसर्गिक संभोग केला व झालेला अनैसर्गिक संभोगाचा व्हिडीओ आरोपी हणमंत देवकर याने केला व तेथून निघून गेला.

दिनांक – २१.११.२०२१ रोजी दुपारी १२.३० वा. चे सुमारास आरोपी हणमंत देवकर याने पुन्हा पिडीत मुलास फोन करून कॉलेजच्या गेटवर बोलावून संभोगाची मागणी केली व त्याचे मोबाईलमधील त्यांचेतील अनैसर्गिक संभोगाचा व्हिडीओ दाखविला. व ” तु आज माझ्यासोबत आला नाहीस तर तुला आता दाखविलेला व्हिडीओ मी व्हायरल करीन” अशी धमकी दिली व निघून गेला. सदर प्रकाराबाबत पिडीताने मित्रास सांगितले.

त्यानंतर पोलीस ठाणेत येवून त्याच्या विरोधात काल गुन्हा दाखल केला आहे गुन्हयातील आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हणमंत देवकर यास अटक करण्यात आलेली आहे. पीडित मुलाचे वय २१ वर्षे , असून आरोपीचे वय ३४ वर्षे, आहे आरोपीचे लग्न होऊन त्याला दोन मुले आहेत. आरोपी देवकर २०१० मध्ये नोकरीस लागला, सांगलीहून काही महिन्यांपूर्वी बदली होऊन इस्लामपूर पोलीस स्टेशन मध्ये काम करत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here