सांगली – ज्योती मोरे
महापौर सध्या फक्त आपल्या प्रभागांमध्ये व तसेच आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांनाच्या प्रभागामध्ये बायनेम कोट्यावधी रुपयांचा निधी आणण्यात व मलीदा वाटण्यात व्यस्त आहेत. महानगरपालिकेमध्ये 78 नगरसेवक आहेत व 20 प्रभाग आहेत त्या प्रभागासाठी त्या प्रभागातील नागरिकांच्या विकासकामाचे महापौरांची काही दायित्व आहे किंवा नाही?
या महानगरपालिकेच्या इतर प्रभागांमध्ये विकास कामे रखडली आहेत त्याठिकाणी निधीचा अभाव आहे या प्रभागांसाठी महापौर निधी आणणार का फक्त राजकीय खन्नसीतुन आपल्याच पक्षाच्या व आपल्या प्रभागांच्या लोकांसाठीच निधी उपलब्ध करून देणार आहेत?
ज्या वेळेस महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती त्यावेळी सर्व 20 प्रभागांसाठी भारतीय जनता पार्टीने 100 कोटी रुपयांचा निधी आणला त्या वेळेस कोणताही दुजाभाव भारतीय जनता पक्षाने केला नाहीत हा आदर्श विद्यमान महापौर घेणार का?तो निधि समान देण्यात आला होता.
पुढील काही दिवसांमध्ये महापौर जनतेच्या दारी जाणार आहेत असा काही कार्यक्रम त्यांनी आखला आहे हा कार्यक्रम फक्त दिखावाच ठरू नये अशी आमची अपेक्षा आहे,प्रत्येक प्रभागांमधील नागरिकांच्या समस्या जाणून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा व त्यात त्या प्रभागातील समस्या सोडवाव्यात व निधि उपलब्ध करुण द्यावा दुजाभाव करु नये हीच अपेक्षा सर्व नागरिकांचे आहे.
हा तुमचा कार्यक्रम फक्त राष्ट्रवादी नगरसेवक असलेल्या प्रभागातच राबवणार आहात की सर्व प्रभागात ? हे येत्या काळात जनतेच्या समोर येईलच परंतु आपण पुर्ण सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे महापौर आहात हे विसरता कामा नये भविष्यात आपल्या या उपक्रमातुन नागरिकांचे प्रश्न सुटतील व सर्व राहिलेल्या प्रभागांमध्ये पण निधी द्याल हीच आशा आहे.!