पावसाची अनियमितता व खरीप पिकांचे नियोजन : जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा शेतकऱ्यांच्या बांधावर…

मोसमी पावसाची सुरुवात जिल्ह्यातील काही तालुक्यात चांगली झाली. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. पावसाचे प्रत्यक्ष प्रमाण , जमिनीतील ओलावा व पेरणीची सद्यावस्था यांचा आढावा हेण्यासाठी ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र (DAMU), कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला) यांनी चिखली तालुक्यातील सवणा गावातील शेतकऱ्यांशी त्यांच्या बांधावर जाऊन दिनांक २१.०६.२०२१ रोजी सुसंवाद साधला.

यावेळी जिल्हा कृषी हवामान केंद्र, बुलढाणाचे मनेश यदुलवार (कृषी हवामान तज्ञ), अनिल जाधव (कृषी हवामान निरीक्षक) तसेच कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाच्या कृषी शास्त्रज्ञ डॉ. जगदीश वाडकर उपस्थित होते.पावसाचे असामान विभाजन, त्याची अनियमितता पेरणीच्या हंगामात निश्चितच व्यत्यय आणणारी ठरू शकते, यासाठी शेतकरी बंधूंनी पेरणी करताना सलग दोन-तीन दिवस पुरेसा पाऊस पडल्यावर ( ७५-१०० मिमी. ) व जमिनीत उपयुक्त ओल यांची खात्री करूनच पेरणी करावी असे प्रतिपादन कृषी हवामान तज्ञ, मनेश यदुलवार यांनी केले.

ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र (DAMU), कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्याद्वारे दर मंगळवारी आणि शुक्रवारी हवामान अंदाजावर आधारित तालुकानिहाय आणि पीकनिहाय कृषी सल्ला पत्रिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाते. त्यासोबतच विस्तारित हवामान अंदाज प्रणालीच्या माध्यमातून दोन आठवड्यांचा पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना दिला जातो.

या हवामान आधारित कृषी सल्ल्याचा शेतकर्यांना त्यांच्या दैनंदिन शेतीकामाच्या नियोजनात महत्वाचा वाटा आहे म्हणून मोठ्या संख्येने शेतकरी वर्गाने या कृषी सल्ला पत्रिकेचा लाभ घ्यावा व शेतीचे उत्तमोत्तम व्यवस्थापन करावे असे आवाहन यदुलवार यांनी यावेळी केले.पीक प्रात्यक्षिकांचे महत्व व त्याचे शेती उत्पादनात होणारे फायदे यावर सखोल मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञ डॉ. जगदीश वाडकर यांनी यावेळी केले.

याप्रसंगी कृषी सहायक अमोल बाहेकर तसेच सवणा येथील विजय भुतेकर, ज्ञानेश्वर शेळके,पदमाकर भुतेकर, राजेद्र भुतेकर, विठठल पवार,राहुल पवार यांचेसह इतर शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांशी संवाद साधताना मनेश यदुलवार, कृषी हवामान तज्ञ,कृषी विज्ञान केंद्र,बुलढाणा
डॉ. जगदीश वाडकर, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here