IPL2021| हर्षल पटेलने रचला इतिहास…IPL मध्ये एकमेव गोलंदाज बनला…

IPL2021 – कालच्या सामन्यात हर्षल पटेल हॅटट्रिकपासून हुकला, मात्र परंतु त्याच्या पाच विकेटमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) शुक्रवारी येथे मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीगचे उद्घाटन सामन्यात मात दिली. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करीत 9 गमावून 159 धावा करता आल्या.

पटेलने चार षटकांत 27 धावा देऊन पाच विकेट घेतल्या, ही कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. मुंबईविरुद्ध कोणत्याही गोलंदाजाचे हे सर्वोत्तम गोलंदाजीचे विश्लेषण आहे. त्यांच्याशिवाय मोहम्मद सिराज (चार षटके 22 धावा) आणि काईल जेम्सन (27 धावांत ) यांनीही चांगली गोलंदाजी केली. पटेलनेही 5 विकेट्ससह एक विशेष विक्रम केला.

आयपीएलच्या इतिहासात हर्षल पटेल मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 बळी घेणारा एकमेव गोलंदाज ठरला आहे. हार्दिकने हार्दिक पंड्या, ईशान किशन, क्रुणाल पंड्या, कैरान पोलार्ड आणि मार्को जेन्सन या फलंदाजांना बाद करून 5 बळी मिळविल्या. आयपीएलच्या लिलावात हर्षलला आरसीबीने 20 लाख रुपयांत विकत घेतलं होतं आणि त्याच्या टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता.

मुंबईकडून सलामीवीर ख्रिस लिन (35 चेंडूत 49 चौकार, तीन षटकार) आणि सूर्यकुमार यादव (23 चेंडूंत 31 चार चौकार, एक षटकार) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करून मुंबईला मोठ्या धावसंख्येवर नेले. त्यानंतर क्षेत्ररक्षकांची मदत न मिळाल्यामुळे आरसीबी गोलंदाजांनी फलंदाजांना दबावात आणले. शेवटच्या चार षटकांत केवळ 25 धावा केल्या. पटेलने डावाच्या शेवटच्या षटकात केवळ एक धाव दिली आणि तीन गडी बाद केले.

नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम फलंदाजीला सुरवात केली. कर्णधार रोहित शर्माने (15 चेंडूत 19) चौथ्या षटकात युजवेंद्र चहल (चार षटकांत ४१ धावा) वर षटकार ठोकला, परंतु लिनच्या गोंधळामुळे तो धावबाद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here