न्यूज डेस्क – इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सिजन ची सुरुवात आजपासून होत आहे, UAE होणाऱ्या लोकप्रिय टी -20 स्पर्धेचा प्रथम सामना अबुधाबी च्या सुंदर मैदानावर खेळला जात असून क्रिकेट प्रेमींना आजपासून T20 थरार बघायला मिळणार आहे.
गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. अबू धाबीच्या स्टेडिअममध्ये हा सामना होईल. या सामान्यात सर्वांचे लक्ष मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस.धोनीच्या कामगिरीकडे असणार आहे.
माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी अखेर इंग्लंड आणि वेल्समध्ये आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरीत खेळताना दिसला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आणि माजी कर्णधाराने 50 धावांची खेळी केली. या सामन्यापासून त्याचे चाहते आपल्या स्टार यष्टीरक्षक फलंदाजाच्या परत येण्याची वाट पहात आहेत. 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
2019 च्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या 13 महिन्यांनंतर धोनी आज संध्याकाळी प्रथमच मैदानात उतरला. 9 जुलै 2019 नंतर धोनी 19 सप्टेंबर 2020 रोजी सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात धोनी आपल्या संघाचा कर्णधार होता.
मुंबई इंडियन्सचा संघ आज चेन्नई विरुद्ध पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या १० पैकी आठ सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. आतापर्यंत सलामीच्या तीन लढतीपैकी दोनदा मुंबई इंडियन्सने चेन्नईला हरवले आहे. मागच्यावर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जवर एका धावेने विजय मिळवला होता.