IPL2020 | DC vs KXIP पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी…अशी असेल दिल्लीची टीम

न्यूज डेस्क – पंजाबने लोकेश राहुलला कर्णधारपदाची संधी दिली आहे. त्याने पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीचे पारडे जड मानले जात आहे.

जेसन रॉयने स्पर्धेतून माघार घेतली असली तरी शेमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अ‍ॅलेक्स कॅरी असे धडाकेबाज विदेशी फलंदाज दिल्लीकडे उपलब्ध असून अय्यर, ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉ यांच्या रूपात भविष्यातील तारेही त्यांच्या ताफ्यात आहेत. रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, संदीप लामिच्छाने असे दर्जेदार फिरकीपटू दिल्लीकडे असून ‘आयपीएल’मध्ये नेहमीच फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून आले आहे.

पंजाबकडे मुजीब-उर-रेहमान, रवी बिश्नोई, कृष्णप्पा गौतम असे नव्या दमाचे फिरकीपटू असून दिल्लीच्या फलंदाजांसाठी ते डोकेदुखी ठरू शकतात. यंदा प्रथमच पंजाबचे नेतृत्व के. एल. राहुलकडे सोपवण्यात आले असून फलंदाजीत त्याला धडाकेबाज ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मयांक अगरवाल यांची साथ लाभेल. मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉट्रेल यांच्या वेगवान जोडीवरही चाहत्यांचे लक्ष असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here