IPL2020 | DC vs KXIP पंजाबने दिल्लीला १५७ धावांवर रोखले…असा दिल्लीचा आहे स्कोरबोर्ड…

न्यूज डेस्क – DC vs KXIP यांच्यात होत असलेल्या पहिल्याच सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने तो निर्णय सार्थक ठरवीत दिल्लीला १५७ धावावर रोखण्यात यश मिळविले, तर दिल्लीने आपले ८ गडी गमावत पंजाब ला १५८ धावांचे लक्ष्य दिले.

मोहम्मद शमी आणि पंजाबच्या इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाची गाडी रुळावरुन घसरली आहे. २० षटकांत दिल्लीचा संघ १५७ धावांपर्यंत मजल मारु शकला. पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी १५८ धावांची गरज आहे.

आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी दिल्लीला चांगलीच महागात पडली. परंतू अखेरच्या षटकांत स्टॉयनिसने फटकेबाजी करुन सर्व कसर भरून काढली. स्टॉयनिसने २१ चेंडूत ५३ धावांची खेळी करुन दिल्लीचा डाव सावरला.

दुबई आंतरराष्ट्रीय श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल्स आणि लोकेश राहुलचा किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुबईच्या मैदानावर सामना होत आहे. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

पंजाब आणि दिल्ली या दोन्ही संघांनी एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवलेलं नाही. परंतू यंदाचा संपूर्ण हंगाम हा युएईत होणार असल्यामुळे प्रत्येक संघाला विजयाची समान संधी असल्याचं मानलं जातंय.

BatsmenRunsBallsSR4s6s
Prithvi Shawc Chris Jordan b Mohammad Shami5955.5510
Shikhar Dhawanrun out (KL Rahul)020.0000
Shimron Hetmyerc Mayank Agarwal b Mohammad Shami71353.8410
Shreyas Iyerc Chris Jordan b Mohammad Shami3932121.8703
Rishabh Pantb Ravi Bishnoi3129106.8940
Marcus Stoinisrun out (Nicholas Pooran)5321252.3873
Axar Patelc KL Rahul b Sheldon Cottrell6966.6600
Ravichandran Ashwinc Mohammad Shami b Sheldon Cottrell4666.6600
Kagiso RabadaNOT OUT000.0000
Anrich NortjeNOT OUT31300.0000
EXTRAS(nb 2, w 6, b 1, lb 0, pen 0)9
TOTAL(8 wickets; 20 overs)157
BowlerORWEconDots
Sheldon Cottrell42426.0013
Mohammad Shami41533.7515
Chris Jordan456014.008
Krishnappa Gowtham43909.755
Ravi Bishnoi42215.509

FALL OF WICKETS

  • 1-6 (Dhawan, 1.4 ov) ,
  • 2-9 (Shaw, 3.3 ov) ,
  • 3-13 (Hetmyer, 3.6 ov) ,
  • 4-86 (Pant, 13.6 ov) ,
  • 5-87 (Iyer, 14.1 ov) ,
  • 6-96 (Patel, 16.1 ov) ,
  • 7-127 (Ashwin, 18.6 ov) ,
  • 8-154 (Stoinis, 19.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here