IPL2020 | चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का…IPL सोडून सुरेश रैना भारतात परतला…

न्यूज डेस्क – इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सीजन पूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फलंदाज सुरेश रैना या स्पर्धेतून माघारला आहे. वैयक्तिक कारणास्तव तो भारतात परत येत आहे. फ्रँचायझी संघ चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या भारत परत येण्याविषयी माहिती दिली आहे. रैनाच्या निर्णयाचे समर्थन करत संघाने त्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना पूर्ण पाठिंबा देण्यास सांगितले आहे.

चैन्नई सुपरकिंगचा फलंदाज सुरेश रैना कौटुंबिक कारणामुळे भारतात परतला आहे. संपूर्ण IPL रैना खेळणार नसल्यानं संघाला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केई विश्वनाथन यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. टीमकडू रैनाच्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य मिळेल असंही त्यांनी सांगितलं.

‘सुरेश रैना वैयक्तिक कारणास्तव भारतात परतला आहे. संपूर्ण हंगामासाठी तो संघाबाहेर असेल. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज सुरेश आणि त्याच्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य करेल’, असं CSKच्या सीईओने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here