IPL 2020 | DC vs CSK दिल्लीने चेन्नई सुपर किंग्जला ४४ धावांनी दिली मात…

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रातील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली राजधानी यांच्यात दुबई मध्ये खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीने चेन्नईला 44 धावांनी पराभूत करून स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदविला. त्याचवेळी आयपीएल 2020 मध्ये चेन्नई संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.

नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने आजच्या सामन्यासाठी एन्गिडीच्या जागी जोश हेजलवूडला संधी दिली. परंतू शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी करत चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली.

पृथ्वी शॉने यादरम्यान आपलं अर्धशतक साजरं केलं. ही जोडी दिल्लीसाठी मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच पियुष चावलाने शिखर धवनला माघारी धाडत दिल्लीची जोडी फोडली. तो ३५ धावा काढून माघारी परतला. यानंतर अर्धशतकवीर पृथ्वी शॉही चावलाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. ४३ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह पृथ्वीने ६४ धावांची खेळी केली.

ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाजांमध्ये अर्धशतकी भागीदारीही झाली, परंतू मोक्याच्या षटकांत धावा करण्यात ते अपयशी ठरले. १९ व्या षटकाच्या अखेरीस कर्णधार श्रेयस अय्यर माघारी परतला. यानंतर स्टॉयनिस आणि पंत जोडीने दिल्लीला १७५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून पियुष चावलाने दोन तर सॅम करनने एक बळी घेतला.

DELHI CAPITALS INNINGS (RUN RATE: 8.75)

BatsmenRunsBallsSR4s6s
Prithvi Shawst MS Dhoni b Piyush Chawla6443148.8391
Shikhar Dhawanlbw Piyush Chawla3527129.6231
Rishabh PantNOT OUT3725148.0060
Shreyas Iyerc MS Dhoni b Sam Curran2622118.1810
Marcus StoinisNOT OUT53166.6610
EXTRAS(nb 0, w 3, b 0, lb 5, pen 0)8
TOTAL(3 wickets; 20 overs)175

BowlerORWEconDots
Deepak Chahar43809.504
Sam Curran42716.7510
Josh Hazlewood42807.0010
Piyush Chawla43328.258
Ravindra Jadeja444011.004

FALL OF WICKETS

  • 1-94 (Dhawan, 10.4 ov) ,
  • 2-103 (Shaw, 12.2 ov) ,
  • 3-161 (Iyer, 18.6 ov)

CHENNAI SUPER KINGS INNINGS (RUN RATE: 6.55)

BatsmenRunsBallsSR4s6s
Murali Vijayc Kagiso Rabada b Anrich Nortje101566.6610
Shane Watsonc Shimron Hetmyer b Axar Patel141687.5011
Faf du Plessisc Rishabh Pant b Kagiso Rabada4335122.8540
Ruturaj Gaikwadrun out (Rishabh Pant)51050.0000
Kedar Jadhavlbw Anrich Nortje2621123.8030
MS Dhonic Rishabh Pant b Kagiso Rabada1512125.0020
Ravindra Jadejac Amit Mishra b Kagiso Rabada129133.3310
Sam CurranNOT OUT1250.0000
EXTRAS(nb 0, w 4, b 0, lb 1, pen 0)5
TOTAL(7 wickets; 20 overs)131
BowlerORWEconDots
Kagiso Rabada42636.5011
Axar Patel41814.5010
Anrich Nortje42125.2512
Avesh Khan442010.507
Amit Mishra42305.756

FALL OF WICKETS

  • 1-23 (Watson, 4.2 ov) ,
  • 2-34 (Vijay, 5.6 ov) ,
  • 3-44 (Gaikwad, 9.1 ov) ,
  • 4-98 (Jadhav, 15.4 ov) ,
  • 5-113 (du Plessis, 17.2 ov) ,
  • 6-130 (Dhoni, 19.3 ov) ,
  • 7-131 (Jadeja, 19.6 ov)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here